मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण क्र.४९ महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अधिनियम विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास वर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम २००० दि.२६ जानेवारी २०२४ या अधिसूचनेच्या मसुद्याबाबत हरकत नोंदविण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. याबाबत त्यांनी राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सचिवांना पत्र दिले आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रात म्हटले आहे की, मराठा समाजाचा ओबीसींमध्ये सरसकट समावेश करण्यासाठी सगेसोयरे या शब्दाच्या व्याख्येबाबत शासनाने असाधारण क्र.४९ महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अधिनियम विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास वर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम २००० दि.२६ जानेवारी २०२४ अन्वये नियमांचा मसुदा तयार केला आहे.या मसुद्यावर हरकत नोंदविण्यासाठी दि १६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.कोणत्याही कायदेशीर मसुद्यावर हरकत नोंदवायला ३० दिवस मुदत देणे हा सर्वसामान्य नियम असल्याचे म्हटले आहे.
तसेच सदर विषय हा कायदेशीर आणि क्लिष्ट असल्या कारणाने गाव खेड्यापर्यंत या विषयाची माहिती व्हायला वेळ लागत आहे.त्याचप्रमाणे शासनाने पत्राद्वारे हरकत मागवल्या असुन या हरकती मंत्रालयात मुंबईला पोस्टाने यायला वेळ लागणार असल्याने अधिसूचनेच्या मसुद्याबाबत हरकत नोंदविण्यासाठी दि.१६ फेब्रुवारी पासून किमान १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी असे मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रात म्हटले आहे.
नाशिक : विवाह सोहळयातून छायाचित्रकाराची बॅग चोरी करणाºया चोरट्यांस पोलीसांनी बेड्या ठोकल्या. ही घटना नांदूर जत्रा लिंकरोडवरील समृध्दी बॅक्वेट हॉल येथे घडली होती. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित पुंडलिक झगडे (२१ रा.भोये गल्ली सिन्नर) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी तेजस विठ्ठलराव शिंदे (रा. पालखेडरोड दिंडोरी) यांनी फिर्याद दिली आहे. शिंदे यांचा फोटोग्राफीचा व्यवसाय असून गेल्या २ फेब्रुवारी रोजी ते नांदूर जत्रा लिंकरोडवरील समृध्दी बॅक्वेट हॉल येथे विवाह सोहळ््याची आॅर्डर करीत असतांना ही घटना घडली होती. अज्ञात चोरट्यांनी लॉन्स मधील स्टेज जवळ ठेवलेली छायाचित्रकाराची बॅग चोरून नेली होती. या बॅगेत कॅमेºयाच्या लेन्स, मेमरी कार्ड, बॅटरी चार्जर, गोडॉक्स ट्रिगर,लेन्स कॅप,सेल चार्जर असा सुमारे १ लाख ७७ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज होता. याप्रकरणी शिंदे यांनी पोलीसात धाव घेताच पोलीसांनी घटनास्थळावरील सीसीटिव्ही यंत्रणेच्या आधारे भामट्याचा माग काढत संशयितास जेरबंद केले असून अधिक तपास हवालदार नरवडे करीत आहेत.