नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नांदूर जत्रा लिंकरोडवरील कौशल्या हॉटेल समोर भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ४४ वर्षीय पादचारी महिला ठार झाली. रेश्माबाई राजू पाटील (रा.मातोश्री बंगला,गणपतनगर,नांदूरनाका) असे मृत महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. रेश्माबाई पाटील या गेल्या मंगळवारी (दि.६) रात्रीच्या वेळी नांदूर जत्रा लिंकरोडने पायी आपल्या घराकडे जात असतांना हा अपघात झाला होता.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. याबाबत रोहित पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस दप्तरी अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.