इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज आमदार पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्याबरोबर कोण कोणते आमदार काँग्रेस सोडणार आहे, त्याची चर्चा आता सुरु झाली आहे. त्यात या १३ आमदारांचे नाव चर्चेत आहे. विजय वडेट्टीवार, आ. विश्वजित कदम, आ. अमित देशमुख व धीरज देशमुख, सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे, अस्लम शेख, आमदार जितेश अंतापूरकर, सुरेश वरपूडकर, विकास ठाकरे, कैलास गौरंट्याल, संजय जगताप आदी बड्या नेत्यांचा समावेश असल्याचे समजते. हे सर्व जण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
त्याचबरोबर माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी मंत्री डी. पी. सावंत, आमदार रमेश बागवे, हनुमंत बेटमोगरेकर, अमीन पटेल, सुलभा खोडक, अमित झनक आदी नेतेही काँग्रेस सोडण्याच्या तयारीत आहेत, असे सांगितले जाते. नांदेड दक्षिणचे काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे, हदगावचे काँग्रेस आमदार माधव जवळगावकर हे चव्हाण यांच्या समर्थनार्थ आमदारकीचा राजीनामा देणार आहे.
अस्लम शेखसह काही आमदारांना भाजपत जाण्यात अडचण असली, तर ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे.