इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याचे वृत्त आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असल्याची चर्चा असून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
याअगोदर देवरा व बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस सोडून दिल्यानंतर मोठा धक्का बसलेला आहे. त्यातच अशोक चव्हाण यांचे वृत्त समोर आल्यामुळे राजकीय वर्तूळात खळबळ निर्माण झाली आहे.
गेल्या काही तासांपासून अशोक चव्हाण हे नॅाट रिचेबल आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी चव्हाण भाजपमध्ये गेले तर काँग्रेसला हा मोठा धक्का असणार आहे.