नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आर्थिक वादातून पाच ते सहा जणाच्या टोळीने सराईत गुन्हेगार संदेश चंद्रकांत काजळे (चय ३५, रा. विजयनगर, सिडको) याचे अपहरण करून निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर त्याचा मृतदेह मोखाडा भागात नेऊन जाळून टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी अपहरणासह खुनाचा गुन्हा दाखल केला असून, नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे साखा गुनिट १ ला पथकाने या हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधारास अटक केली आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल दिनेश उन्नावणे (वय २३, रा. ओम साई निवास, निमाणो बसस्टॉपसमोर, राजवाडा, पंचवटी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे, शुक्रवारी (दि. ९) मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास संदेश काजळे निमाणी वसस्थानकासमोरील इमारतीच्या मागील पार्किंगमध्ये आला त्याठिकाणी त्याचे संशयित मित्र स्वप्निल उन्नावणे, नितीन उर्फ पप्पू चौगुले (रा. ड्रीम कॅसलमागे, मख्मलाचाद रोड), रणजित आहेर (रा. राजवाडा, पंचवटी), पवन भालेराव (रा. राजवाडा, त्र्यंबकेश्वर) व अन्य साथीदारांमध्ये आर्थिक देवाणघेवाणीतून वाद झाले.
संशयितांनी काजळे यास मारहाण करून त्याचे कारमधून अपहरण केले.
यासंदर्भात संदेशचा चुलतभाऊ प्रीतेश काजळे याने पंचवटी पोलिसांत अपहरण झाल्याची तक्रार दिली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड गांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या अपहरण प्रकरणाचा तपास सुरू असताना, रविवारी (दि. ११) पहाटेच्या सुमारास मोखाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताकपाडा परिसरातील निर्जन जंगलात काजळे याचा अर्धवट जळालेला मृतदेह मोखाडा पोलिसांना मिळून आला. या मृतदेहाच्या तपासात काजळे याच्या अपहरणाच्या दाखल गुन्ह्यातील माहिती व त्याचे वर्णन काजळे याच्याशी जुळत असल्याने मोखाडा पोलिसांनी नाशिक शहर पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. त्यानुसार पंचवटी आणि गुन्हे शाखा बुनिट-१ च्या पथकाने समांतर तपास केला असता, संशयित उन्नावणे हा कारने त्रंबक भागात असल्याची माहिती मिळाली. युनिट १ चे वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून त्यास अटक केली, उर्वरित फरार संशयितांचा शोध सुरू आहे.
काजळे सराईत गुन्हेगार
संदेश काजळे याच्यावर यापूर्वी खंडणी, अवैध सावकारी, मारहाण, खुनाचा प्रयत्न, फसवणूक, दमदाटी, अॅट्रोसिटीसह अन्य गंभीर गुन्हे दाखल होते. काजळे याने काही वर्षापूर्वी दोन डीजेवादकांना मारहाण करीत सिगारेटचे चटके दिले होते. वाढदिवस सुरू असताना मद्याच्या नशेत त्याने इतर नऊ जणांसह या वादकांचा लैंगिक छळ करून मारहाण केली होती, त्यानंतर तो फरार झाला होता, काही दिवसांत ग्रामीण पोलिसांनी त्याला व त्याच्या साथीदारांना अटक केली होती.