इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : मायक्रोवेव्ह ओव्हन ही आजच्या काळात किचन तथा स्वयंपाक घरातील जणू काही गरज बनली आहे अनेक पदार्थ तयार करण्यासाठी किंवा गरम करण्यासाठी या अत्याधुनिक यंत्राचा वापर होतो. मात्र याचा वापर करताना काही गोष्टीची काळजी घेणे आवश्यक ठरते. कारण मायक्रोवेव्हमध्ये काही खाद्यपदार्थ पुन्हा गरम केल्याने त्यांची चव आणि पौष्टिक मूल्य बिघडू शकते. मायक्रोवेव्हमध्ये आपण कोणते पदार्थ गरम करू शकतो आणि कोणते पदार्थ गरम करणे योग्य नाही, हे सर्वांनाच माहित असले पाहिजे. मायक्रोवेव्हमध्ये काही पदार्थ गरम करणे टाळले पाहिजे.
मायक्रोव्हेवला लाईफ सेव्हर म्हणून ओळखलं जाते, मात्र यामध्ये काही पदार्थ गरम करणे हे अगदी विषासमान आहे. एका संशोधनानुसार या पदार्थांना तापविल्यामुळे मानवी शरीरात चक्क विषबाधा होऊ शकते. शिल्लक राहिलेले अन्न खाताना नेहमी अन्न गरम केले जाते. बऱ्याचदा या कामासाठी मायक्रोओव्ह ओव्हन खूप उपयोगी ठरतो, विशेषत: जेव्हा गृहीणी घाईत असतात तेव्हा सकाळी गडबडीत नाश्ता असो की, दुपारचे जेवण असो किंवा रात्रीचे जेवण असो, पटकन मायक्रोओव्ह ओव्हनमध्ये पुन्हा गरम करता येऊ शकता. परंतु सर्वच पदार्थ पुन्हा गरम करू नये. कारण सर्व अन्न मायक्रोवेव्हमध्ये पुन्हा गरम केल्यानंतर चांगला स्वाद देत नाही.
मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये काही पदार्थ पुन्हा गरम केल्यावर ते एकतर दूषित होतात किंवा कोरडे होतात आणि बेचव होतात. आहार तज्ज्ञांच्या मते, साठवलेल्या अन्नातील बॅक्टेरिया प्रथिनांचे आणखी विघटन करतात आणि अन्नाचे पौष्टिक मूल्य काढून टाकतात. यामुळे अन्न विषबाधा सारख्या समस्या देखील होऊ शकते. चव देखील बदलू शकते. त्याचप्रमाणे हिरव्या पालेभाज्या मायक्रोव्हेवमध्ये पुन्हा गरम केल्यास घातक परिणाम होतात. यामध्ये नैसर्गिकरित्या असलेल्या नाइट्रेटचे रुपांतर नायट्रोसामाइनमध्ये असे आहार तज्ञांचे मत आहे. त्यामुळे सर्वच पदार्थ गरम करण्यासाठी मायक्रोव्ह ओव्हनचा उपयोग नाही. त्यामुळे यापुढे काळजी घ्या.. आहार तज्ञांचा सल्ला घ्या…