इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आग्राः पत्नी राजस्थानात देवदर्शनाला गेल्यानंतर पतीने आपली आई आणि १२ वर्षाच्या मुलाची विष पाजून हत्या करून नंतर त्याने आत्महत्या केली. तरुण चौहान असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याची पत्नी राजस्थानमधील सिकर येथील खातू श्यामजी मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या.
मोलकरीण घरी पोहोचली, तेव्हा तिला तरुण चौहान यांचा मृतदेह लटकताना दिसला. तरुण यांच्या आई आणि मुलाचा मृददेह बेडवर होता. मोलकरणीने तात्काळ पोलिसांना ही माहिती दिली. या कुटुंबात तरुण चौहान, त्यांची आई, पत्नी आणि मुलगा असे चार सदस्य होते. त्यांची पत्नी राजस्थानच्या सिकर येथील खातू श्यामजी मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. तरुण यांनी सर्वात आधी आई आणि मुलाला विष दिले. आणि नंतर त्यांनी आत्महत्या केली.
तरुण चौहान यांची आई गेल्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होती. त्यांच्या डोक्यावर कर्ज असल्याने त्यांनी दोन खून करून नंतर आत्महत्येचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज आहे. तरुण यांनी काही दिवसांपूर्वी पेप्सीची डिलरशिप घेतली; परंतु त्यातून त्यांना मोठे नुकसान सहन झाले होते. कर्ज फेडण्यासाठी त्यांनी घराचा एक भाग विकला होता. पत्नी स्वत: दर्शनाला गेली, की पतीनेच तिला पाठवले, हे तपासानंतर स्पष्ट होऊ शकेल.