बुधवार, ऑगस्ट 27, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

राज्य शासनाचा उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचा निकाल जाहीर, नाशिकचे हे मंडळ ठरले विजेते

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 12, 2023 | 1:03 am
in राज्य
0
NEW LOGO 5 1140x570 1 e1697044589258

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई- राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने घेण्यात आलेल्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते गुरुवार १२ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. अकोला येथील श्री खडकेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास प्रथम, सांगली जिल्ह्यातील तिरंगा गणेशोत्सव मंडळ (यशवंतनगर, विटा, ता. खानापूर) आणि तृतीय पुरस्कार पुणे जिल्ह्यातील मार्केट यार्ड मित्र मंडळ ( मंचर आंबेगाव) यांना जाहीर झाला आहे. याशिवाय जिल्हानिहाय पारितोषिक विजेतेही जाहीर करण्यात आले आहेत. राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास रुपये ५ लाख, व्दितीय क्रमांकास रुपये २.५० लाख आणि तृतीय क्रमांकास रुपये १ लाख इतक्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तर उर्वरित ४१ गणेशोत्सव मंडळांस राज्य शासनाकडून प्रत्येकी रुपये २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे दुपारी ४ वाजता हा पारितोषिक प्रदान समारंभ होणार असून खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सदा सरवणकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी भैरी भवानी परफॉर्मिग आर्टस् यांचे सादरीकरण असलेला गणराज रंगी नाचतो हा सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या प्रकल्प संचालक मीनल जोगळेकर यांनी केले आहे.

या स्पर्धेतील जिल्हानिहाय विजेते खालीलप्रमाणे आहेत.

  • मुंबई ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
  • पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ
  • निकदवरी लेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
  • मुंबई उपनगर: १. स्वप्नाक्षय मित्र मंडळ, २. बर्वेनगर व भटवाडी सार्व. गणेशोत्सव मंडळ, घाटकोपर(प) ३. बाल मित्र कला मंडळ, विक्रोळी (प)
  • ठाणे : १. श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळ ठाणे २. (विभागून) एकवीरा मित्रमंडळ ठाणे आणि रिव्हरवूड पार्क सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ३. शिवसम्राट मित्र मंडळ, ठाणे
  • पालघर: साईनगर विकास मंडळ, पालघर
  • रायगड: संत रोहिदास तरुण विकास मंडळ, ता. महाड
  • रत्नागिरी: जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, जैतापूर
  • सिंधुदुर्ग : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सलईवाडा, सावंतवाडी
  • पुणे : १. नवज्योत मित्रमंडळ ट्रस्ट, खडकी, उत्कर्ष तरुण मंडळ, चिंचवडगाव
  • सातारा:सार्वजनिक क्रीडा गणेशोत्सव मंडळ, सावली, ता. सातारा
  • कोल्हापूर ,:श्री गणेश तरुण मंडळ, ढेंगेवाडी
  • सोलापूर: श्री जगदंबा गणेशोत्सव सांस्कृतिक आणि सामाजिक क्रीडा मंडळ, माढा
  • नाशिक: श्री प्रतिष्ठान मंडळ, नाशिक
  • धुळे: वंदे मातरम प्रतिष्ठान, देवपूर
  • जळगाव: जळगाव जनता बँक कर्मचारी गणेश मंडळ, जळगाव
  • नंदुरबार : क्षत्रीय माली नवयुवक गणेशोत्सव मंडळ, तळोदा
  • अहमदनगर : सुवर्णयुग तरुण मंडळ
  • छत्रपती संभाजीनगर : जय मराठा गणेश मंडळ, चिखलठाण
  • जालना : कारेश्वर गणेश मंडळ, देवगाव खवणे ता. मंठा, जि. जालना
  • हिंगोली : श्री सिद्धिविनायक सार्वजनिक गणेश मंडळ, एन टी सी, हिंगोली
  • परभणी : स्वराज्य गणेश मंडळ, देवनंदरा
  • धाराशिव : बाल हनुमान गणेश मंडळ, गवळी गल्ली, धाराशिव
  • नांदेड : अपरंपार गणेश मंडळ, नांदेड
  • बीड : जय किसान गणेश मंडळ, मठ गल्ली, किल्ले धारूर
  • लातूर : बाप्पा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लातूर
  • नागपूर : शिवस्नेह गणेश उत्सव कमिटी
  • गडचिरोली लोकमान्य गणेश मंडळ, गडचिरोली
  • गोंदिया : सार्वजनिक बाळ गणेश मंडळ, बोडगाव
  • चंद्रपूर : सार्वजनिक गणेश मंडळ चंद्रपूर
  • वर्धा : बाळ गणेश उत्सव मंडळ, समुद्रपूर
  • भंडारा : हनुमान व्यायामशाळा गणेशोत्सव मंडळ, मोहगाव देवी, मोहाडी
  • अमरावती : श्री बजरंग गणेशोत्सव मंडळ
  • बुलढाणा : भक्ती गणेश महिला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,
    बुलढाणा व सहकार्य फाऊंडेशन क्रीडा व बहु. संस्था, चिखली (विभागून)
  • वाशीम : मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळ वाशीम.
  • यवतमाळ : रिद्धी सिद्धी गणेश मंडळ
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चाणक्य नीति… या ४ गोष्टींपासून लांबच रहा… अन्यथा आयुष्यातून आनंद गेलाच समजा…

Next Post

सावधान! मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये पदार्थ गरम करताय? आधी हे नक्की वाचा…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

भूमित्र या चॅटबॉट सेवेचे उद्घाटन 3
संमिश्र वार्ता

महसूल विभागाने ‘महाभूमी’ संकेतस्थळावर ‘भूमित्र’ या चॅटबॉट सेवेची केली सुरुवात

ऑगस्ट 27, 2025
Milind Kadam M4B
संमिश्र वार्ता

मुंबई येथून रत्नागिरी व सिंधुदुर्गसाठी प्रवासी जलवाहतूक सेवा…इतक्या तासाचा असेल प्रवास

ऑगस्ट 27, 2025
Sadan Ganesh 1 11 913x420 1
महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत महाराष्ट्र सदनात गणेशोत्सवाचा जल्लोष; आज ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठा

ऑगस्ट 27, 2025
ajit pawar e1706197298508 1024x770 1
महत्त्वाच्या बातम्या

लंडनमधील ‘महाराष्ट्र भवन’ साठी ५ कोटींचा निधी….उपमुख्यमंत्री अजित पवार

ऑगस्ट 27, 2025
ganeshotsav 1 e1738348574343
मुख्य बातमी

यंदा बाप्पा वाजत गाजत येणार… अशी करा श्रीगणेशाची स्थापना… असा आहे मुहूर्त…

ऑगस्ट 27, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना जुने मित्र भेटेल, जाणून घ्या, बुधवार, २७ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 26, 2025
IMG 20250826 WA0402
स्थानिक बातम्या

नाशिक जिल्हा परिषद विकास निर्देशांकात राज्यात प्रथम…मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते गौरव

ऑगस्ट 26, 2025
Untitled 44
संमिश्र वार्ता

३० महिला शेतकऱ्यांनी उच्च दर्जाची हिरवी मिरची पिकवून तब्बल ४० मेट्रिक टन उत्पादनची दुबईला केली निर्यात

ऑगस्ट 26, 2025
Next Post
Untitled 40

सावधान! मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये पदार्थ गरम करताय? आधी हे नक्की वाचा…

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011