इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
वाशिम शहरातील मदन चौधरी आणि गणेश चौधरी या समाजकंटकांकडून जाणूनबुजून जिओ केबल कापून नेटवर्कला अडथळा आणल्याचे प्रकार समोर आले असून यामुळे सर्व सामान्य नागरिक, विद्यार्थी आणि ऑनलाइन सेवा पुरवणाऱ्या घटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याप्रकरणी जिओ नेटवर्कची देखभाल करणाऱ्या प्रताप टेक्नॉक्रॅटच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अत्यावश्यक सेवेत अडथळा आणल्याप्रकारनी भादवी कलम २५ भारतीय टेलिग्राफ कायदा अधिनियम १८८५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून जाणूनबुजून खोडकरपणे असे प्रकार केल्याने सर्वसामान्य नागरिक त्रासले आहेत. कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याप्रकरणी वाशिम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिस पुढील तपास करत आहेत. नेटवर्क ला अडथळा आणन्याचे प्रकार वाशिम शहर तसेच परिसरात केल्याने ऑन्लाइन सेवा ठप्प झाल्याने सर्व सामान्य ग्राहक, विद्यार्थी यांची मात्र मोठी अड्चन झाली. कंपनिने कोट्यवधी रुपये गुंतउन उभारलेल्या नेटवर्कची नासधुस केल्याने नियमित रिचार्ज करत असलेल्या ग्राहकाना मनस्ताप होत आहे. नेटवर्क दुरुस्ती साठी गेलेल्या कंपनी कर्मचाऱ्यांना दोघांकडून धमकवण्यात आले.
नुकत्याच आलेल्या टेलीकॉम पॉलिसीमध्ये टेलिकॉम हि अत्यावश्यक तसेच शासकीय सेवेत समाविष्ट केली असून या सेवेत अडथळा आणल्यास कडक कारवाईची तरतूद केली आहे. आरोपींकडून वाशिम शहरातील विविध भागात केबल कट करणे, नेटवर्क सामग्री ची नासधूस करणे , अत्यंत महाग अशी केबल चोरून नेणे असे समाजविघातक प्रकार करण्यात आले . ग्राहकांच्या तक्रारींची दाखल घेऊन जीओ च्या फिल्ड इंजिनिअर्स कडून दिवस रात्र अथक परिश्रम करून नेटवर्क सुरळीत ठेवले गेले . दुरुस्ती करणाऱ्या कंपनीच्या नेटवर्क इंजिनिअर्स ला धमकावले देखील जात आहे. कंपनीने या गंभीर प्रकारांची दखल घेऊन ग्राहकांना होणारा मनस्ताप टाळण्यासाठी तसेच समाजविघातक कृत्यांना आळा घालन्यासाठी शेवटी गुन्हा दाखल केला
एकीकडे सगळ्यांना उत्कृष्ट स्पीड सह नेटवर्क हवे आहे तर याच वेळी काही समाजविघातक घटक नेटवर्क ची नासधूस करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये ग्राहक जीओला जबाबदार धरत असून वस्तुस्थिती समोर आणणे गरजेचे आहे. टॉवर आहेत परंतु नेटवर्क नसल्याची ओरड केली जाते. बऱ्याच ठिकाणी टॉवर ची बॅटरी चोरून नेणें, डिझेल चोरी, केबल चोरून नेणे असे प्रकार देखील सतत घडत असून यावेळी स्थानिक ग्रामस्थ, प्रशासन, तसेच पोलिसांनी लक्ष घालण्याचे गरजेचे आहे. कोरोना काळात अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश असलेल्या टेलिकॉम कंपन्यांपुढे अशी अनेक आव्हाने असून तरीही सर्वाना सिमलेस नेटवर्क देण्यासाठी कंपनीचे कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत असतात. अशा प्रवृत्तींना आळा घालुन कंपनीला सहकार्य करावे अशी सर्वसामान्य ग्राहकांची आणि जनमानसाची भावना आहे