नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संस्कृत भाषेचे जतन व्हावे,भाषा जनसामान्यांपर्यत पोहचावा यासाठी गेल्या खा गोडसे यांच्याकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.मुंबईत पुरेसी जागा उपलब्ध होत नसल्याने नाशिक शहरात संस्कृत विद्यापीठाचे केंद्र उभारणीचा निर्णय केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय विभागाने घेतला आहे.केंद्राच्या उभारण्यासाठी पुरेसी आणि विस्तीर्ण जागा उपलब्ध करून देण्या विषयीचे पत्र विद्यापीठ प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला पाठविले आहे.जागा उपलब्ध झाल्यावर विद्यापीठ कॅम्पसमध्ये पायाभूत सुविधांसाठी केंद्र शासनाकडून पहिल्या टप्प्यातच तीनशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली आहे.
संस्कृत भाषेला देशात आणि देशाबाहेरही अनन्यसाधारण महत्त्व आहे.असे असले तरी गेल्या अनेक वर्षांपासून संस्कृत भाषा जतन करण्यासाठी हवे तसे प्रयत्न होत नसल्याने आज मितीस संस्कृत भाषा अडगळीला पडल्याची चित्र समोर येत आहे.यातूनच संस्कृत भाषेचे जतन व्हावे यासाठी खासदार गोडसे यांच्याकडून गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीस्थित केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय प्रशासनाकडे प्रयत्न सुरू होते.
खासदार गोडसे यांच्याकडून सुरू असलेल्या सततच्या प्रयत्नांना यश आले आहे.केंद्रीय संस्कृत महाविद्यालय प्रशासनाने नाशिक येथे विद्यापीठाचे केंद्र उभारणीचा निर्णय घेतला आहे.यासाठी योग्य आणि विस्तीर्ण जागा उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला पत्र पाठविले आहे यातूनच प्रशासनाने शिलापूर शिवारातील सुमारे चाळीस एकर जागेची पाहणीही केलेली आहे. संस्कृत भाषेचे जतन व्हावे,भाषा समृद्ध व्हावी तसेच भाषेचे संवर्धन व्हावे हा विद्यापीठ उभारणी मागचा मुख्य उद्देश आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून पारंपारिक भारतीय ज्ञान प्रणालींना प्रोत्साहन देण्यात येणार असून शैक्षणिक उत्कृष्टतेला चालना मिळणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिले आहे.