इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जालनाः मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या अधिसूचनेप्रमाणे कार्यवाही न केल्याने मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील आजपासून उपोषण करणार आहेत.
मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या नवीन अध्यादेशाची झाली नाही, तर दहा तारखेपासून उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. सरकारने मराठा आरक्षणाबाबत नवीन अध्यादेश काढल्याने जरांगे यांनी २६ तारखेपासूनचे उपोषण मागे घेतले होते. सरकारने या अध्यादेशाची तात्काळ अमलबजावणी करावी, अशी जरांगे यांची मागणी होती. त्याची अंमलबजावणी होत नसल्याने आजपासून आंतरवाली सराटीमध्ये ते उपोषणाला बसणार आहेत. सरकारने सगेसोयऱ्यांबाबत कायदा मंजूर करावा, अशी त्यांची मागणी आहे.
उपोषणाला बसण्यापूर्वी जरांगे पाटील आंदोलकांसोबत बैठक घेणार आहेत. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. आंतरवाली सराटीतील त्यांचे हे चौथे आहे. मराठा समाजाचा पुन्हा एकदा घात होवू नये, यासाठी उपोषण करणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. येत्या दोन दिवसांत विशेष अधिवेशन बोलवावे, सगेसोयऱ्यांबाबत काढलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे, त्याची अंमलबजावणी करावी, मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार विशेष अधिवेशनात कायदा मंजूर करून, तो अहवाल न्यायालयात सादर करावा आदी मागण्यांसाठी जरांगे आजपासून उपोषण करणार आहेत.