इंडिया दर्पण ऑलाईन डेस्क
मुंबईः राज्याचे अन्नपुरवठामंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र त्यांच्या नाशिकमधील पत्त्यावर आल्याने खळबळ उडाली आहे. या पत्रात भुजबळ यांना मारण्याची पाच जणांनी त्यांची सुपारी घेतली असल्याचे म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून भुजबळांना कधी धमक्याचे फोन, तर कधी मेसेज येत आहे. त्यात आता त्यांना थेट मारण्याची धमकी देणारे पत्र आले आहे. या पत्रात पन्नास लाख रुपये घेऊन ही सुपारी दिली असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
या पत्रात तुम्ही कुठेही फिरू नका. पाच लोक शोधात आहेत, असा सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. भुजबळ यांना या यापूर्वी धमकी देण्यात आल्यानंतर त्यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.