नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आज खासदार हेमंत गोडसे यांनी आज आपल्या कुटुंबासह दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली.खासदार गोडसे यांनी जिल्ह्याच्या विकासाविषयी अंतिम मान्यतेसाठी केंद्राकडे प्रलंबित असलेल्या विविध प्रकल्पांच्या प्रस्तावाविषयी पंतप्रधानांशी चर्चा केली.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी गोडसे यांची नात शरण्याला टेबलावर उभे करत पंतप्रधान बडा क्या शरण्या बडी असा लाडिक सवाल करून शरण्याला बोलते करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी खा. गोडसे यांच्या कुटुंबियातील सौ.अनिता हेमंत गोडसे, संजय करंजकर, सौ सुजाता संजय करंजकर आदी उपस्थित होते.