नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बांधकाम ठेकेदाराकडून उर्वरित बिलाचे अनुदान मंजुरी प्रस्ताव सादर करून, सदरची रक्कम अदा करण्याकरिता तळेगाव (अं) येथील ग्रामसेवक ज्ञानेश्वर शांताराम शिंपी २५ हजाराची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले. त्यांच्यावर त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचे मुलास तळेगांव (अं) येथील स्मशान भूमी संबंधी कामकाजाकरिता ९ लााख ९६ हजार ५३८ रुपयाचे कामकाज ग्रामपंचायत तळेगांव (अं) येथून मिळाले होते. त्यापैकी शासकीय फी कापून रुपये ७ लाख ४७ हजार ७०० रुपये त्यांच्या मुलास मिळाले होते. उर्वरित बिलाचे अनुदान मंजुरी प्रस्ताव सादर करून, सदरची रक्कम अदा करण्याकरिता लोकसेवक यांनी दिनांक ९ फेब्रुवारी २०२४ रोजी तक्रारदार यांचेकडे २५ हजार रुपये लाचेची मागणी करून, सदर लाचेची रक्कम पंचा समक्ष स्वीकारली असता, त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यशस्वी सापळा अहवाल
युनिट – नाशिक
तक्रारदार- पुरुष वय- 58
आरोपी ज्ञानेश्वर शांताराम शिंपी,वय 42वर्षे , धंदा – नोकरी , ग्रामसेवक, सजा तळेगांव (अं), ता. जि.नाशिक
*लाचेची मागणी 25000/
*लाच स्विकारली – 25000/
*लाच मागणी व लाच स्विकारली दिनांक -09/2/2024
*लाचेचे कारण* -.तक्रारदार यांचे मुलास तळेगांव (अं) येथील स्मशान भूमी संबंधी कामकाजाकरिता 996538 रुपयाचे कामकाज ग्रामपंचायत तळेगांव (अं) येथून मिळाले होते. त्यापैकी शासकीय फी कापून रुपये 7,47,700 रुपये त्यांच्या मुलास मिळाले होते. उर्वरित बिलाचे अनुदान मंजुरी प्रस्ताव सादर करून, सदरची रक्कम अदा करण्याकरिता लोकसेवक यांनी दिनांक 9/2/2024 रोजी तक्रारदार यांचेकडे 25000 रुपये लाचेची मागणी करून, सदर लाचेची रक्कम पंचा समक्ष स्वीकारली असता, त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून
त्रबकेश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सापळा अधिकारी:- परशुराम कांबळे, पोलीस निरीक्षक,ला.प्र. वि. नाशिक
*सापळा पथक – पोहवा प्रफुल्ल माळी ,पोना/ विलास निकम