इंडिया दर्पण वृत्तसेवा
राज्यात पुन्हा लोडशेडींगचे संकट येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून हे संकट जवळपास संपले होते. पण, आता राज्यातील सातही औष्णिक विद्युत केंद्रातील वीजनिर्मिती सलग तिसऱ्या दिवशी प्रभावीत झाल्यामुळे निम्मी वीजनिर्मिती होत आहे. या सातही केंद्रात वीजनिर्मिती क्षमता ९ हजार ५४० मेगॅव्हॅट इतकी आहे. पण, आता ४ हजार ७३२ मेगाव्हॅट वीजनिर्मिती होत आहे.
या सातही औष्णिक विद्युत केंद्रात पाऊस, ओला कोळसा आणि दुरुस्तींच्या कामामुळे वीजनिर्मिती प्रभावित झाल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यातील कोराडी येथील औष्णिक विद्युत केंद्राची क्षमता २१९० आहे. पण, या ठिकाणी ११६४ वीजनिर्मिती होत आहे. नाशिक येथील केंद्राची क्षमता ६३० आहे. पण, या ठिकाणी १३० वीजनिर्मिती होत आहे. भुसावळ येथील केंद्राची क्षमता १२१० आहे. पण, या ठिकाणी ७२६ वीजनिर्मिती होत आहे.
पारस येथील केंद्राची क्षमता ५०० आहे. पण, या ठिकाणी ३४६ वीजनिर्मिती होत आहे. परळी येथील केंद्राची क्षमता ७५० आहे. पण, या ठिकाणी ४१४ वीजनिर्मिती होत आहे. खापरखेडा येथील केंद्राची क्षमता १३४० आहे. पण, या ठिकाणी ८१९ वीजनिर्मिती होत आहे. चंद्रपूर येथील केंद्राची क्षमता २९२० आहे. पण, या ठिकाणी १११४ वीजनिर्मिती होत आहे. या सर्व केंद्राची मिळून ९ हजार ५४० वीजनिर्मितीची क्षमता आहे. पण, आता ४ हजार ७३२ मेगाव्हॅट वीजनिर्मिती होत आहे.