नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महामार्गावरील सर्व्हीस रोडवर एकतर्फी प्रेमातून एकाने भररस्त्यात आई वडिलांना मारहाण करीत त्यांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून संशयितास पोलीसांनी अटक केली आहे.
अनिकेत आनंद साळुंके (२४ रा.राजरत्न नगर,सिडको) असे संशयिताचे नाव आहे. अल्पवयीन पिडीतेने याबाबत तक्रार दाखल केली आहे. पिडीत मुलगी बुधवारी (दि.७) सायंकाळी आपल्या आई वडिलांच्या समवेत महामार्गाच्या सर्व्हीस रोडने जात असतांना संशयिताने एकतर्फी प्रेमातून तिची वाट अडविली.
यावेळी मुलीच्या आई वडिलांनी त्यास जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता संतप्त संशयिताने शिवीगाळ करीत दोघांना हाताच्या चापटीने मारहाण केली. तसेच मुलीचा विनयभंग केला. अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.