नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारत निवडणूक आयोगामार्फत लोकसभा सार्वत्रिक निवडणुक- २०२४ चा कार्यक्रम नजीकच्या कालावधीत जाहीर होणार असून या निवडणूकीसाठी इच्छुक उमेदवार नामनिर्देशन पत्र दाखल करणार आहेत. त्यानुसार आगामी लोकसभा निवडणूकांच्या अनुषंगाने संभाव्य उमेदवारांनी निवडणूक खर्चासाठी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी किमान एक दिवस अगोदर स्वतंत्र बँक खाते उघडावे, असे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
आगामी लोकसभा निवडणूकांच्या अनुषंगाने नामनिर्देशनपत्र दाखल करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी निवडणूक खर्चाकरीता उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी किमान एक दिवस आधी स्वतंत्र बँक खाते उघडावे.
यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत भारतीय रिजर्व बँकेच्या कार्यकारी संचालक यांना सहकार्य करण्याबाबत सूचना देण्यात आल्याचे ही उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मंगरूळे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.