सटाणा (इंडिया दर्पण वृतत्तसेवा) – मनोज जरांगे पाटील हे गुरुवारी नाशिक जिल्ह्याच्या दौ-यावर आले असतांना ठिकठिकाणी त्यांचे जंगी स्वागत झाले. त्यामुळे त्यांच्या नियोजित कार्यक्रमांना उशिर झाला. त्यानंतर ते बागलाण येथील प्रसिध्द अशा साल्हेर किल्ल्यावर रात्री १२ वाजता गेले.
या किल्ल्यावर त्यांनी सरदार सूर्याजी काकडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत सरदार सूर्याजी काकडे यांचे वंशज उपस्थित होते. नांदगाव येथेही मध्यरात्री जरांगे पाटील पोहचले. येथेही मध्यरात्री त्यांचे जोरदार स्वागत झाले.