इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्यातील पहिले वातानुकिलित बस स्थानक नाशिक येथे सुरू होणार असून १० फेब्रुवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते मेळा बस स्थानकाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. १.७३ हेक्टर जागेमध्ये वसलेल्या या बस स्थानकात ६०३३.२२ चौरस मीटर इमारतीची बांधकाम करण्यात आले आहे. नागरिकांना प्रवेशासाठी स्वतंत्र द्वार असणाऱ्या या बस स्थानकात तळघरात प्रशस्त पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या बस स्थानकात २० फलाट असून यापैकी ४ फलाट वातानुकूलित करण्यात आलेले आहे.
नाशिकमध्ये होणारे या बस स्थानकात चालक व वाहक महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र विश्रामगृह करण्यात आलेले आहे. मातांना आपल्या लहान बाळाची काळजी घेता यावी यासाठी स्वतंत्र हिरकणी कक्ष तयार करण्यात आलेला आहे. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र विश्रामगृह तयार करण्यात आलेले आहे. या बस स्थानकात अपंगांना प्रवेश करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेले असून अपंगांसाठी स्वतंत्र प्रसाधाण गृहे देखील तयार करण्यात आलेले आहे. या बस स्थानकाचा संपूर्ण परिसर रिमिक्स ट्रिमिक्स काँक्रीट करण्यात आलेला असून बस स्थानकात स्वतंत्र वाहतूक नियंत्रण कक्ष महिला व पुरुषांसाठी प्रशस्त प्रसाधन गृह नागरिकांना अल्पोपहार करता यावा यासाठी उपाहारगृह तयार करण्यात आलेले आहे. नागरिकांना पार्सल देता यावे यासाठी स्वतंत्र पार्सल रूम देखील बस स्थानकात तयार करण्यात आलेली असून सुरक्षेसाठी स्वतंत्र पोलीस चौकी तयार करण्यात आलेली आहे.
या अत्याधुनिक बस स्थानकामुळे नाशिक शहराच्या सौंदर्यात वाढ होणार असून नाशिककर नागरिकांनी बस स्थानकाच्या लोकार्पण कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार देवयानी फरांदे यांनी केले आहे.