नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील महालक्ष्मी मध्यवर्ती मंडळातर्फे ‘जीवनगौरव’ व “समाजभुषण” पुरस्कार प्रदान सोहळा रविवार १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वा. कॉलेज रोड वरील गुरुदक्षिणा सभागृहाच्या ‘पलाश’ हॉलमध्ये होणार आहे अशी माहिती अध्यक्ष सीए सी.जे. गुजराथी व सचिव राजाभाई गुजराथी यांनी दिली.
दसा श्रीमाली वैष्णव गुजराथी समाजातील काही बंधु भगिनींचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांच्या कार्याची सर्वांना माहिती व्हावी व युवा पिढीला त्यांच्याकडून प्रेरणा मिळावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. प्रा. सुरेश गुजराथी, (राजगुरुनगर) सौ. सुरेखा नवसारीकर (नाशिक), डॉ. प्रताप गुजराथी (मनमाड), डॉ. किरण गुजराथी (शिरपूर), डॉ. संजय मालवी (इंदौर) यांना जीवनगौरव पुरस्कार तर श्री. प्रदीपभाई गुजराथी (मनमाड), डॉ. विजया गुजराथी (पुणे), सौ. वसुधा गुजराथी (नाशिक), सौ. माधवी गुजराथी – शाह (नवसारी), श्री. दिपक पाटोदकर (येवला), श्री. अच्युत गुजराथी (नाशिक), श्री. मनिष गुजराथी (सिन्नर) यांना समाजभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. जीवनगौरव व समाजभूषण पुरस्कारार्थीना अनुक्रमे रु. अकरा हजार, पाच हजार रु. रोख व सर्व पुरस्कार्थीना स्मृतिचिन्ह व शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती कार्याध्यक्ष डॉ. डी.एम. गुजराथी यांनी दिली.
या पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री राजुभाई गुजराथी उपस्थित राहणार असुन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वस्त श्री. दिलीपभाई गुजराथी, श्री. हेमंत गुजराथी, सी.ए. उज्वल नवसारीकर, श्री. समीरभाई गुजराथी, आयोजन समिती सदस्य प्रयत्नशील आहेत. या कार्यक्रमाला समाज बंधु भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन महालक्ष्मी मध्यवर्ती मंडळाने केले आहे.