इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
काँग्रेसचे मुंबईतील जेष्ठ नेते बाब सिद्दीकी यांनी काँग्रेस सोडली असून ते १० फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार आहे. सिध्दीकी काँग्रेसचे मोठे नेते असून मुस्लिम चेहरा म्हणून ते राजकारणात प्रसिध्द आहे. तीन वेळा वांद्रा येथून ते आमदार म्हणून निव़डून आले. १९९९,२००४,२००९ मध्ये त्यांनी हे यश मिळवले. त्यांनी मंत्रीपदही भूषवले आहे. २०१४ मध्ये ते भाजपचे आशिष शेलार यांच्याकडून पराभूत झाले. अभिनेता संजय दत्त, शाहरुख खान, सलमान खानसह त्यांचे अनेकांशी कौटुंबिक संबध आहे.
काँग्रेसचा राजीनामा देतांना त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली असून त्यात म्हटले आहे की, मी तरुणपणात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील झालो आणि ४८ वर्षांचा हा एक महत्त्वाचा प्रवास आहे. आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे @INCIndia तातडीने. मला व्यक्त करायला खूप काही आवडले असते पण ते म्हणतात त्याप्रमाणे काही गोष्टी न सांगितल्या जातात.
या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो.