चाळीसगाव (इंडिया दर्पण वृतसेवा ) – शहरातील एका माजी नगरसेवकावर गोळीबार झाल्याचे वृत्त समोर येत आहे. दरम्यान, हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद झाल्याचेही कळते.
चाळीसगाव पालिकेचे माजी नगरसेवक बाळू मोरे हे दुपारी पावणेपाच वाजेच्या सुमारास त्यांच्या ऑफिसमध्ये बसलेले होते. याचवेळी त्यांच्यावर अज्ञात युवकांनी गोळीबार केला आहे. दरम्यान, घटनेनंतर तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हल्ला कोणत्या कारणामुळे झाला याबाबत अधिकृत माहिती समोर येऊ शकली नाही. मात्र, हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला असल्याची चर्चा आहे.
तसेच सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार हल्लेखोरांनी आपला चेहऱ्यावर रुमाल सारखे कापड बांधलेले होते. हल्लेखोरांची संख्या ३ ते ५ असण्याची शक्यता असून हल्लेखोर एका कारमधून आल्याचेही कळतेय. गोळ्या झाडल्याबरोबर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झालेत, मात्र, एका सीसीटीव्हीत हल्लेखोर कैद झाल्याचेही कळते.