नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कळवण येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील सहाय्यक प्रकल्प अधिकारी बन्सीलाल महादू पाटील (५३) हे दोन हजार रुपये लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात अडकले.
या कारवाईबाबत लाच लुचपत प्रतिबंध विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांना मा प्रकल्प अधिकारी कळवण यांचे आदेशान्वये आश्रम शाळे वरती हजर करून न घेतल्याने तक्रारदार हे सहाय्यक प्रकल्प अधिकारी बन्सीलाल महादू पाटील यांना भेटण्यासाठी गेले असता त्यांनी तक्रारदार यांच्याकडे मुख्याध्यापक यांना हजर करून घ्या असे सांगून मदत करण्याचे सांगण्याचे मोबदल्यात ५ हजार रुपये लाचेची मागणी दिनांक 01/02/2024 ,दिनांक 06/02/2024 रोजी केली व तडजोडी अंती दिनांक 07/02/2024 रोजी २ हजार रुपये लाचेची रक्कम पंच यांचे समक्ष एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कळवण येथे स्वीकारली आहे.
*यशस्वी सापळा कारवाई
*युनिट -* नाशिक
तक्रारदार- पुरुष
*आलोसे- बन्सीलाल महादू पाटील ,वय – 53 वर्ष, पद -सहाय्यक प्रकल्प अधिकारी,कळवण,वर्ग -2,
*लाचेची मागणी- 5,000/- रुपये दिनांक 01/02/2024
दिनांक 06/02/2024 लाच स्विकारली- 2,000/ – रुपये
दिनांक 07/02/2024 हस्तगत रक्कम- 2,000/- रुपये
*लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांना मा प्रकल्प अधिकारी कळवण यांचे आदेशान्वये आश्रम शाळे वरती हजर करून न घेतल्याने तक्रारदार हे सहाय्यक प्रकल्प अधिकारी आलोसे पाटील यांना भेटण्यासाठी गेले असता आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे मुख्याध्यापक यांना हजर करून घ्या असे सांगून मदत करण्याचे सांगण्याचे मोबदल्यात 5,000/- रुपये लाचेची मागणी दिनांक 01/02/2024 ,दिनांक 06/02/2024 रोजी केली व तडजोडी अंती दिनांक 07/02/2024 रोजी 2,000/- रुपये लाचेची रक्कम पंच यांचे समक्ष एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कळवण येथे स्वीकारली आहे.
- हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
- सापळा अधिकारी – गायत्री मधुकर जाधव पोलिस निरीक्षक,ला.प्र.वि. नाशिक
- सापळा पथक – पो. हवा. संदीप वणवे, म पो. ना. ज्योती शार्दूल.