नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक मध्य विधानसभा मतदार संघातील विविध कामांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते लोकार्पण व भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे. १० फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ६.०० वा. मेळा बस स्थानक येथे या भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आलेले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादाजी भुसे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात नामदार छगनरावजी भुजबळ साहेब ना. गिरीश महाजन व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील विविध कामांचे भूमिपूजन करण्यासाठी मेळा बस स्थानक येथे भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला असून येथे नव्याने बांधण्यात आलेल्या मेळा बस स्थानकाचे लोकार्पण होणार आहे. त्याच पद्धतीने अपंगांसाठी बांधण्यात आलेल्या दिपाली नगर येथील राज्यातील सर्वात मोठे दिव्यंग भवन असणाऱ्या अटल स्वाभिमान भवनचे देखील लोकार्पण करण्यात येणार आहे. नाशिक येथे शिक्षण घेणाऱ्या नर्सिंगच्या मुलींसाठी आरोग्य विभागा कडून बांधण्यात येणाऱ्या नर्सिंग होस्टेलचे भूमिपूजन देखील ऑनलाइन पद्धतीने उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.
गंगापूर रोड येथील नागरिकांच्या सर्वाधिक पसंतीचे प्रमोद महाजन गार्डन नवीन रूपात दिसणार आहे. प्रमोद महाजन गार्डनच्या नूतनीकरणाचे देखील भूमिपूजन ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. संत गोरोबाकाका कुंभार यांच्या महाराष्ट्रातील एकमेव मंदिराचे व सभामंडपाचे भूमिपूजन देखील यावेळी करण्यात येणार आहे. याचबरोबर स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत जुने नाशिक येथे बांधण्यात आलेल्या स्वर्गीय सुरेश मानकर जलकुंभ व हुतात्मा आनंद कान्हेरे मैदान येथे बांधण्यात आलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जलकुंभ यांचे देखील लोकार्पण नामदार फडणवीस साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या स्मार्ट स्कूलचे देखील लोकार्पण नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.
नाशिक मध्ये विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार देवयानी फरांदे यांच्याकडून करण्यात येत आहे.