वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवा
एकीकडे जुन्या मालिका बंद असतांना दुसरीकडे झी मराठी वरती सध्या नवनवीन मालिकांच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. आता नवीन मालिका आली म्हणजे प्रमोशन सुद्धा जोरदार करावे लागणार… त्यामुळे या मालिकांच्या प्रमोशनसाठी दोन प्रसिदध अभिनेत्री अश्विनी भावे आणि ‘मृणाल कुलकर्णी या रिंगणात उतरल्या आहे.
झी मराठी १२ फेब्रुवारीपासून आपल्या प्रेक्षकांसाठी २ नव्या मालिका घेऊन येत आहे. दोन नव्या मालिका, दोन नव्या नायिका, दोन नव्या गोष्टी. माणुसकीला जपणारी, आपुलकीने वागणारी, मनसोक्त हसणारी ‘पारू’ ,अशा नटखट, अवखळ पारूची भूमिका साकारणार आहे ‘शरयू सोनावणे’. तर दुसरीकडे अन्यायाला भिडणारी, हक्कासाठी लढणारी, बिनधास्त जगणारी, निडर ‘शिवा’, ही जणू धगधगता पेटता निखारा आणि ही भूमिका साकारणारी आहे ‘पूर्वा कौशिक. तर अशा ह्या दोन भिन्न स्वभाव, दोन नव्या गोष्टी प्रेक्षकांना आपलंस करून घेतील ह्यात शंकाच नाही.
जेव्हा दोन नवीन तारका झी मराठीवर आगमन करत आहेत तर त्यांचं मायेनं स्वागत करायला मराठी मनोरंजनसृष्टीतील दोन प्रसिदध अभिनेत्री अश्विनी भावे आणि ‘मृणाल कुलकर्णी’ सज्ज झाल्या आहेत. त्यांची साथ देत आहेत झी मराठीच्या लाडक्या नायिका उमा, अक्षरा, नेत्रा आणि अप्पी. अश्विनी भावे यांनी बर्याच वर्षानंतर मनोरंजन विश्वात कमबॅक केलं असून त्या आता झी मराठीवरील सिरीयलच्या प्रमोशनच्या निमित्ताने टिव्ही वरती पहायला मिळणार आहेत.