नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- घरफोडीत चोरट्यांनी सुमारे पावणे आठ लाखाच्या ऐवज लंपास केले. नाशिकरोड येथील जगताप मळा भागात ही घरफोडी झाली. त्यात सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुहासिनी विष्णू साने (रा.सुनिराज बंगला,जगतापमळा तरणतलाव रोड) यांनी याबाबत फिर्याद दिलली आहे. साने कुटुंबिय २७ जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घरफोडी झाली.
अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले सुमारे ७ लाख ७१ हजार रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक भामरे करीत आहेत.