नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – डिझनी हॉटस्टार या अॅपचे सबक्रिप्शन अपग्रेड करण्याच्या बहाण्याने भामट्यांनी शहरातील एका वृध्द महिलेच्या बँक खात्यावर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. मोबाईल अॅक्सेस घेवून बँक खात्यातील तब्बल साडे दहा लाखाची रक्कम ऑनलाईन लांबविली असून, याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदिती दिपंकर चॅटर्जी (६० रा.दसकगाव जेलरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. रविवारी (दि.४) भामट्यांनी चॅटर्जी यांच्याशी सपर्क साधला होता. डिझनी हॉटस्टार या अॅपचे सबक्रिप्शन अपग्रेड करण्याच्या बहाण्याने भामट्यांनी चॅटर्जी यांना बोलण्यात गुंतवून भामट्यांनी रिमोट अॅपच्या माध्यमातून हा डल्ला मारला.
चॅटर्जी यांच्या मोबाईलचा अॅक्सेस व कस्टमर आयडीच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यातील १० लाख ५० हजार रूपयांची रक्कम परस्पर नेट बँकीगद्वारे काढून घेतले. ही बाब निदर्शनास येताच चॅटर्जी यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक शेख करीत आहेत