नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लग्नाचे आमिष दाखवून एकाने २६ वर्षीय तरूणीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. संशयिताने लग्नास नकार दिल्याने युवतीने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हर्षद रामचंद्र जाधव (३२ रा.खोकरविहीर ता.सुरगाणा) असे संशयिताचे नाव आहे. पीडिता व संशयित एकाच भागातील रहिवासी असून तरूणी नाशकात शिक्षण घेत आहे. गेल्या मे महिन्यात तरूणीचा परिचीत असलेल्या संशयिताने नाशिक गाठून तिची भेट घेतली होती. यावेळी त्याने लग्नाचे आमिष दाखवून पेठरोड भागात तिच्यावर बळजबरीने बलत्कार केला.
त्यानंतर त्याने टाळाटाळ करण्यास सुरूवात केल्याने तरूणीने लग्नाचा तगादा लावला असता त्याने नकार दिला. त्यामुळे युवतीने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक विनायक अहिरे करीत आहेत.