इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः टेक इंडस्ट्रीमध्ये टाळेबंदीचा धोका निर्माण झाला आहे. २०२४ वर्ष सुरू होऊन केवळ एक महिना झाला आहे आणि सुमारे ३२ हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. नोकर कपातीची प्रक्रिया मंद होण्याची चिन्हे सध्या दिसत नाहीत. तंत्रज्ञान व्यावसायिकांसाठी हे वर्ष खूप कठीण जाणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जानेवारीतही कपात सुरूच होती
‘लेऑफएफवायआय’ च्या अहवालानुसार, कोरोना महामारीपासून उद्योगातील नोकऱ्यांमधील कपातीचा मागोवा घेणारा एक स्टार्टअप, हे वर्ष अडचणींनी भरलेले असणार आहे. सोमवारीच ‘स्नॅप इंक.’ने त्यांच्या दहा टक्के कर्मचाऱ्यांच्या कामावरून कमी करण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे ५४० कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार आहे. यापूर्वी, ओक्टा. इंक’ ने खर्च कमी करण्यासाठी चारशे कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या काढून टाकण्याची घोषणा केली होती. ॲमेझॉन, सेल्सफोर्स आणि मेटा प्लॅटफॉर्म सारख्या मोठ्या टेक कंपन्या देखील टाळेबंदीच्या शर्यतीत सामील आहेत. ‘लेऑफ.एफवायआ’चे संस्थापक रॉजर ली यांनी एका ईमेलमध्ये लिहिले, की या वर्षीदेखील नोकरीच्या परिस्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे नाहीत. कोरोना महामारीच्या काळात कंपन्या नोकरभरतीत कपात करत आहेत.
तंत्रज्ञान क्षेत्रात आर्थिक मंदी आहे. सध्या तरी यात काही सुधारणा होताना दिसत नाही. त्यांनी सांगितले, की या वर्षी कपात कायम राहील. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात टाळेबंदी झाली होती. नोकऱ्या गमावल्या जात आहेत; मात्र कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात नोकऱ्या वाढत आहेत. रॉजर ली म्हणाले, की नोकऱ्या कपातीमागे आर्थिक कारणे आहेत; मात्र अनेक कंपन्यांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सची (एआय) शर्यत सुरू आहे. यामुळे, त्यांचे लक्ष लोकांना ‘एआय’ च्या ज्ञानाशी जोडण्यावर आहे. त्यामुळे वृद्धांना रोजगार गमवावा लागत आहे. डिसेंबर ते जानेवारी दरम्यान ‘एआय’ कौशल्यांच्या नोकरीच्या पोस्टिंगमध्ये दोन हजारने वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यांत १७ हजार ४७९ एआय नोकऱ्या बाजारात आल्या आहेत.