नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ग्रामपंचायतीत केलेल्या विकास कामांच्या बिलाचे चेक देण्याच्या मोबदल्यात ६ लाख ४७ हजार रुपये लाच घेतांना अक्कलकुवा पंचायत समिती ग्रामसेवक मनोज पावरा व खासगी इसम लालसिंग सिमजी वसावे हे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांची पत्नी ग्रामपंचायत सिंदुरी, तालुका अक्कलकुवा येथे सन २०१६ ते २०२० कालावधीत सरपंच होत्या. यानंतर ग्रामपंचायतीवर शासनाचे प्रशासक कार्यरत होते. या काळात ग्रामपंचायत सिंदुरी अंतर्गत मंजूर असलेले रस्ता काँक्रिटीकरण , पेव्हर ब्लॉक बसवणे अशी विविध आठ प्रकारची ग्रामपंचायतीला मंजूर असलेली कामे तक्रारदार व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी पूर्ण केली आहेत. नमूद कामे पूर्ण झाल्यानंतर कामांबाबतचे बिल ३२ लाख ३४ हजार ग्रामपंचायत सिंदुरीच्या बँक खात्यात शासनाकडुन आले आहेत. नमूद कामांच्या बिलाचे चेक देण्याच्या मोबदल्यात वरील नमूद आरोपी लोकसेवक व आरोपी खाजगी इसम यांनी ३२ लाख ३४ हजार या रकमेच्या वीस टक्के रक्कम म्हणजे ६ हजार ४७ हजार लाचेची मागणी करून ही रक्कम पंच व साक्षीदारां समक्ष स्वीकारली, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
यशस्वी सापळा कार्यवाही
युनिट:- नंदुरबार
तक्रारदार:- पुरुष, वय- ३७, रा. गमण, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार.
आरोपी लोकसेवक :- मनोज पावरा , ग्रामसेवक, पंचायत समिती , अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार. रा. दामोदर नगर, तळोदा. ▶️ आरोपी खाजगी इसम :- लालसिंग सिमजी वसावे, रा. गमण, तालुका अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार.
लाच मागणी रक्कम:- ६,४७,००० /- रू. (सहा लाख सत्तेचाळीस हजार रुपये)
लाचेची मागणी पडताळणी :- दि. ०६/०२/२०२४
लाच स्वीकारली :– दि. ०६/०२/२०२४ रोजी ६,४७,००० /- रू. (सहा लाख सत्तेचाळीस हजार रुपये)
लाच मागणी कारण:– तक्रारदार यांची पत्नी ग्रामपंचायत सिंदुरी , तालुका अक्कलकुवा येथे सन २०१६ ते २०२० कालावधीत सरपंच होत्या. यानंतर ग्रामपंचायतीवर शासनाचे प्रशासक कार्यरत होते. या काळात ग्रामपंचायत सिंदुरी अंतर्गत मंजूर असलेले रस्ता काँक्रिटीकरण , पेव्हर ब्लॉक बसवणे अशी विविध आठ प्रकारची ग्रामपंचायतीला मंजूर असलेली कामे तक्रारदार व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी पूर्ण केली आहेत. नमूद कामे पूर्ण झाल्यानंतर कामांबाबतचे बिल ३२,३४,०००/- (बत्तीस लाख चौतीस हजार रुपये) ग्रामपंचायत सिंदुरीच्या बँक खात्यात शासनाकडुन आले आहेत. नमूद कामांच्या बिलाचे चेक देण्याच्या मोबदल्यात वरील नमूद आरोपी लोकसेवक व आरोपी खाजगी इसम यांनी ३२,३४,०००/- (बत्तीस लाख चौतीस हजार रुपये) या रकमेच्या वीस टक्के रक्कम म्हणजे ६,४७,०००/-रु. लाचेची मागणी करून , ६,४७,०००/-रु. लाचेची रक्कम पंच व साक्षीदारां समक्ष स्वीकारली, म्हणून गुन्हा.हॅश व्हॅल्यू घेण्यात आलेली आहे.
*सापळा अधिकारी :– राकेश आ. चौधरी, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि., नंदुरबार
*सापळा कार्यवाही पथक :-पोहवा/विलास पाटील , पोहवा/देवराम गावित, पोना/संदीप नावाडेकर, पोना/नरेंद्र पाटील, पोना/सुभाष पावरा, पोना/संदीप खंदारे, पोना/हेमंत महाले, चापोना/, जितेंद्र महाले