येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवला बाजार समिती मध्ये आज सकाळी लिलाव सुरू झाल्यानंतर व्यापारी व मापारी यांच्यात सौदा पट्टी वरून वाद झाल्यानंतर मापारी यांनी कामकाज थांबवले. त्यामुळे कांदा लिलाव प्रक्रिया बंद पडली त्यानंतर व्यापारी व मापारी यांची बाजार समिती सभापती यांच्या समवेत बैठक पार पडली. यात कुठलाही तोडगा निघाला नाही.
त्यानंतर मात्र आज आलेली कांदा आवक काढून घेतली जाईल व उद्या या विषयावर व्यापाऱ्यांची पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे. त्यात सौदा पट्टीवर निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या बाजार समितीचे लिलाव होणार की नाही याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान अडीच तास लिलाव प्रक्रिया बंद होती. त्यामुळे दुपारच्या सत्रात लिलाव पुन्हा घेण्यात आले.
गेले १३ दिवस अगोदरच कांदा लिलाव व्यापारी संपामुळे बंद होते. आता मापारी व व्यापारी वाद पुढे आल्यामुळे त्याचा फटका मात्र कांदा उत्पादक शेतक-यांना बसला. आता हा वाद मिटला तर ठिक नाही तर पुन्हा लिलाव बंद राहतील अशी स्थिती आहे.