नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकरोड येथील शिखरेवाडी भागात राहणा-या २७ वर्षीय महिलेने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रगती प्रमोद कुमार (रा.स्वरनिला अपा.शिखरेवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. प्रगती कुमार यांनी रविवारी (दि.४) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये लोखंडी हुकाला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता.
ही घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली. प्रदिप उपाध्याय यांनी त्यांना तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास पोलीस नाईक हिवाळे करीत आहेत.