इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
श्री भगवती – श्री सप्तशृंगी मातेचे मंदिरात नवरात्रोत्सवात भाविकांना २४ तास दर्शन खुले राहणार आहे. १५ ते २४ ऑक्टोबरपर्यंत नवरात्रोत्सव असून या काळात सप्तशृंगीदेवी मंदिर दर्शनासाठी २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय शासकीय अधिकारी, सप्तशृंग निवासिनी ट्रस्ट विश्वस्त, व्यवस्थापक ग्रामपंचायत यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीत भाविकांना श्री सप्तशृंगी मातेच्या दर्शनाची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता जिल्हाधिकारी कार्यालयाने वाहनांसाठी आदेश काढले आहे.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यस्वयंभू शक्तीपीठ असलेल्या श्री सप्तशृंग निवासिनी देवीचा नवरात्रोत्सव अतिशय आनंदात व भक्तिमय वातावरणात होत असतो. गेल्यावेळेस पहिल्याच दिवशी ६० हजार भाविकांनी भगवतीचे दर्शन घेतले होते. तर ९ ते १० हजार भाविकांनी प्रसादालयात मोफत महाप्रसादाचा लाभ घेतला होता. या ठिकाणी वाहनांची मोठी गर्दी होते. त्यामुळे हे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने काढले आहे.. बघा काय आहे आदेश….