दीपक ओढेकर
नाशिक- स्थित रोइंगपटू मृण्मयी साळगावकर भारतातर्फे चीन मधील हॅंगझाऊ येथे १९ व्या आशियाई स्पर्धेत रोइंग मधील दोन प्रकारात खेळली पण दोन्ही ठिकाणी तिला पदकाने हुलकावणी दिली .
रविवारी कॉक्सलेस फोर मध्ये अंतिम फेरीत पोहोचूनही भारतीय संघाला पाचवे स्थान मिळाल्याने तिचे आणि भारताचे पदक हुकले. आज पुन्हा मृण्मयी आणि इतर आठजणीं सह भारतीय महिला संघ कॉक्स्ड एट या प्रकारात पदकासाठी लढला पण पुन्हा एकदा भारतीय संघाच्या पदरी निराशाच पडली!
चीन संघ २००० मी च्या या रेस मध्ये ७ मि आणि ०५: ७१ सें अशी उत्तम वेळ देउन विजेता झाला तर भारतीय संघ जपान, व्हियेतनाम आणि थायलंडच्या नंतर पाच संघांच्या स्पर्धेत ७: ३७:७१ अशी वेळ देउन पाचवा आला. म्हणजेच भारतीय संघ विजेत्या संघाच्या तब्बल ३२:०५ से मागे राहिला. आपण नक्की कुठे कमी पडतो याची दखल संबंधित घेतील अशी आशा करु या. पण पुन्हा एकदा आशियाई स्पर्धेत अंतिम फेरीसाठी आपण पात्र ठरलो हेही नसे थोडके…