नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काम करणा-या दोन कामगारांनीच दुचाकीच्या शोरूममध्ये स्पेअरपार्ट लंपास केले आहे. या चोरीत सुमारे २२ हजार रूपये किमतीचे स्पेअर पार्ट चोरीला गेले आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी एका कामगारास अटक केली आहे.
अल्तमश हुसेन शेख (१९ रा.समतावाडी,भगूर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून ओम किशोर थापा (२६ रा.संसरीगाव) हा संशयित अद्याप फरार आहे. याप्रकरणी पियुश प्रकाश नहार (३८ रा.नेहरूपत,मारवाडी गल्ली भगूर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
नहार यांचे भगूर पांढुर्ली रोडवर नहार अॅटो नावाचे होंडा दुचाकीचे शोरूम आहे. दोघे संशयित या शो रूममधील कामगार असून ते गेल्या शुक्रवारी (दि.२) चोरी करतांना मिळून आले. दोघांना सुमारे २१ हजार ४०० रूपये किमतीचे स्पेअरपार्ट चोरून नेल्याचे पुढे आले असून पोलीसांनी अल्तमस शेख यास अटक केली आहे. अधिक तपास हवालदार गुंजाळ करीत आहेत.