नाशिक (इंडिया दर्पण वृतसेवा) महामार्ग बसस्थानकात बसमध्ये चढत असतांना ठाणे येथील महिलेच्या गळय़ातील ८० हजार रूपये किमतीची सोन्याची पोत भामट्यांनी हातोहात लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कांता कैलास आरसुळे (३५ रा.पोलीस चाळ,पौडपाडा कळवा ठाणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. आरसुळे या नातेवाईकांना भेटण्यासाठी शहरात आल्या होत्या. रविवारी (दि.४) परतीच्या प्रवासासाठी त्या महामार्ग बसस्थानकात गेल्या असता ही घटना घडली. कळवा येथे जाण्यासाठी त्या कसारा नाशिक बसमध्ये चढत असतांना ही घटना घडली.
अज्ञात चोरट्यांनी बसमध्ये चढत असतांना गर्दीची संधी साधत त्यांच्या गळ््यातील सुमारे ८० हजार रूपये किमतीची सोन्याची पट्टी पोत हातोहात लांबविली. अधिक तपास पोलीस नाईक गोडे करीत आहेत.