नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारतीय सैन्यात कार्यरत असलेले जवान, नाशिकचे सुपुत्र हेमंत यशवंतराव देवरे यांना पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले.
मंत्री छगन भुजबळ यांनी वीरमरण आलेल्या हेमंत देवरे यांना श्रध्दांजली अर्पण करतांना म्हटले आहे की, भारतमातेच्या या वीर सुपुत्रास भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी व माझे संपूर्ण परिवार सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो व मृतात्म्यास सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!