इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः महानगर पालिका लवकरच दिल्लीच्या धर्तीवर अंडरग्राउंड मार्केट सुरू करणार आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी त्यासाठी दिल्लीतील कॅनॉट प्सेल बाजाराची पाहणी केली. त्यानुसार आराखडा पालिकेचे अधिकारी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांना देणार आहेत.
फेरीवाला धोरण लागू नसल्याने शहरातील रस्ते आणि पदपथांवर अतिक्रमण झाले आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केसरकर अधिकाऱ्यांना दिल्ली पालिका बाजाराच्या धर्तीवर भूमिगत बाजार उभारण्याची सूचना केली आहे. फेरीवाला बाजार उभारण्यासाठी वॉर्डात मोकळी जागा निश्चित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. बाजार आणि उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीतील पालिका बाजाराला भेट देऊन पाहणी केली. दिल्लीतील कॅनॉटच्या आतील आणि बाहेरी जागेत भूमिगत मार्केट आहे. त्यात ३९८ दुकाने आहेत. याच धर्तीवर मुंबईतही ठिकठिकाणी मार्केट उभारण्याचा प्रस्ताव आहे.
शहरातील सार्वजनिक खुल्या जागा, क्रीडांगणे आणि उद्यानासाठी राखील असलेल्या जमिनींच्या खाली शॉपिंग हब करण्याबाबतचा अहवाल काहीच दिवसांत पालकमंत्र्यांना सादर केला जाणार आहे. भूमिगत बाजारपेठेसाठी अधिकाऱ्यांनी २४ प्रशासकीय वॉर्डाच्या अधिकाऱ्यांना मोकळ्या जागा शोधण्याच्या सूचना दिल्या आहेत.