मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातून जाणारा इंदुर -पुणे या महामार्गावरील मनमाडच्या रेल्वे पूलाचा दोन महिन्या पूर्वी काही भाग कोसळ्याने या मार्गावरर्ची वाहतूक बंद होती. आमदार सुहास कांदे यांनी तातडीने यापुलाच्या कामासाठी राज्य सरकारकडून ३ कोटीचा निधी उपलब्ध करत या पुलाचे काम अवघ्या काही दिवसात पुर्ण करुन घेतले.
रविवारी या पुलाचे लोकार्पण सोहळा आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे सोमवार पासून या मार्गावरुन पुन्हा एकदा इंदुर-पुणे, सुरत-पुणे या राज्य मार्गावरील वाहतूक सुरळीत होणार असून मनमाडच्या नागरीकांना एका भागातून दुस-या भागात जाण्यासाठी जी अडचण होती ती आता दूर झाली आहे.