इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अहमदनगर येथील सभेत अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी १६ नोव्हेंबरलाच मी मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन सभेला गेलो होतो, असा गौप्यस्फोट केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा भुजबळांवर टीका केली. ते म्हणाले की, राजीनामा दे नाहीतर डोक्यावर घेऊन फिर आम्हाला काही फरक पडत नाही. राजीनामा देऊन त्यांनी उपकार केले नाहीत असेही ते म्हणाले.
यावेळी पुढे बोलतांना जरांगे पाटील म्हणाले की, एवढा मोठा मंत्री असूनही झोपेतून उठल्यासारखा बोलतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना बदनाम करण्याचे षडयंत्र भुजबळ यांनी आखले आहे. गोरगरीब लोक मेले पाहिजे, असे त्यांचे विचार आहे असे ते म्हणाले. यावेळी भुजबळांनी अहमदनगरच्या सभेत केलेल्या आरोपाबाबत ते म्हणाले की ओबीसी-मराठा एकत्र डीजे लावून नाचत आहेत. परंतु भुजबळ जातीयतेचे विष पेरत आहेत. ज्या पक्षात जातात, त्याला अडचणीत आणण्याची त्यांची जुनी सवय आहेत, असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी टीका करतांना सांगितले की, शेरोशायरी करणारे भुजबळ दुकान टाकून तीन-तीन रुपये जमा करणार का? असा सवालही त्यांनी केला.