इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ठाणेः राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील बंगल्यात बॉम्ब असल्याचा एक निनावी फोन आल्यानंतर खळबळ उडाली होती. बॉम्बशोधक पथकाने तपासणी केल्यानंतर काहीच आढळले नाही. मात्र दोन दिवसांपूर्वी आव्हाड यांच्या वर हल्ला होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली होती. त्यातून काहीच हाती लागले नाही.
आ. आव्हाड यांचा ठाण्यातील लक्ष्मीनगर भागात बंगला आहे. त्यांच्या निवासस्थानी बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर बॉम्ब शोधक पथक, वर्तकनगर पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानाची तपासणी केली. परंतु तिथे बॉम्बसदृश्य काहीही आढळले नाही. ही अफवा होती.
दोन दिवसांपूर्वी आ. आव्हाड यांनी एक फोटो शेअर करून, मला मारण्यासंदर्भात त्यांच्यात चर्चा सुरू होती. एका पत्रकाराने ती ऐकल्यानंतर पोलिस आणि मला सावध केले. मात्र तेवढ्यात तो निसटून कुठे तरी गेला, असे त्यांनी म्हटले होते. माझ्यासोबत असलेल्या मुलांनी त्याचा केला; पण हाती लागला नाही, असे त्यांनी सांगितले होते.