नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई आग्रा महामार्गावर माणिकखांब फाट्याजवळ पिकपच्या अपघातात एक जण गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी झाले. रविवारी सकाळी ८ वाजता ही घटना घडली. मुंबईकडून नाशिक कडे जाणारी पिकअप चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजक तोडून ती पलटी झाली.
या अपघातात चालक गोपिनाथ आनंदा कडाळे (४०) रा. वाकी यांच्यासह साहेबलाल यादव (२६). अंकुश सितला प्रसाद गुप्ता (२३) रा मुंबई हे जखमी झाले आहे. या अपघातातील वाहन पिकअप MH.02.ER.3462 या गाडीचे नुकसान झाले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच गोंदे फाटा स्पॅाटवर उभी असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची मोफत रुग्णवाहिका लगेचच अपघात स्थळी पोहोचली व जखमींना तात्काळ घोटी ग्रामीण रुग्णालयातमध्ये दाखल करण्यात आले.