बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरु…

by India Darpan
फेब्रुवारी 3, 2024 | 11:35 pm
in राज्य
0
health department 1 e1706726338479

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या पुढाकाराने सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदांचा अनुशेष दूर करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या भरती प्रक्रियेअंतर्गत १० संवर्गातील पदांसाठी अंतरिम निवड व प्रतिक्षा याद्या आणि गुणवत्ता याद्या २ फेब्रुवारी २०२४ रोजी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

राज्य सरकारच्या वतीने गतवर्षी २८ ऑगस्ट २०२३ रोजी मेगा भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. आरोग्य विभागातील गट क व ड संवर्गातील एकूण १० हजार ९४९ पदांसाठी पात्र उमेदवारांची ३० नोव्हेंबर २०२३ ते १२ डिसेंबर २०२३ दरम्यान परीक्षा घेण्यात आली होती. भरती प्रक्रियेतील आहारतज्ञ, कनिष्ठ अवेक्षक, रेडिओग्राफी तंत्रज्ञ, नळ कारागीर, वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक, दंत आरोग्यक, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, हिस्टोपॅथी तंत्रज्ञ, गृह नि वस्त्रपाल, ग्रंथपाल आदी पदांची अंतरिम निवड व प्रतिक्षा याद्या व गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

या १० संवर्गातील नियुक्ती ८ फेब्रुवारी पर्यंत करण्यात येणार असून, उर्वरीत संवर्गातील अंतरिम निवड यादी व प्रतिक्षा यादी ८ दिवसात लावण्यात येणार आहे. नियुक्त्यादेखील लवकरच करण्यात येणार आहेत.भरती प्रक्रिया गतीने व पारदर्शकपणे पूर्ण करण्यासाठी आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी भरती कंपनीच्या प्रतिनिधी समवेत वेळोवेळी बैठका घेऊन तसे निर्देश दिले होते.

संपूर्ण परीक्षा प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यासाठी सरळ सेवा भरतीसाठी टीसीएस संस्थेची निवड करण्यात आली होती. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी टिसीएसकडून सीसीटिव्ही रेकॉर्डिंग, बायोमेट्रीक्स हजेरी, आयरीस तपासणी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. तसेच ईलेक्ट्रॉनिक्स कार्पोरेशन ऑफ इंडिया लि. (ईसीआयएल) यांच्याकडून परीक्षा केंद्रामध्ये परीक्षेच्या कालाधीत ५-जी मोबाईल जॅमर्स ची व्यवस्थाही लावण्यात आलेली होती.

टीसीएसकडून निवड यादीतील उमेदवारांचे बायोमॅट्रीकद्वारे घेतलेल्या हाताच्या बोटांचे ठसे व फोटो कागदपत्रे पडताळणीच्या वेळी त्यांच्याकडील प्रतिनिधींमार्फत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तेव्हा बायोमॅट्रीकद्वारे घेतलेले ठसे व प्रत्यक्ष उपस्थित उमेदवारांचे बोटांचे ठसे व फोटो आयडी याची अंतिम तपासणी करण्यात येणार आहेत.

पदभरती प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी विभागाकडून प्रत्येक जिल्ह्यासाठी एक नोडल अधिकारी व प्रत्येक परीक्षा केंद्राकरिता एका निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्यामार्फत परीक्षेचे पर्यवेक्षण करण्यात आले. या प्रक्रियेत विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी व टिसीएस चे प्रतिनिधी यांनी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली आहे.

गेल्या पाच वर्षात प्रथमच एकूण १० हजार ९४९ पदांसाठी प्रक्रिया राबवून इतक्या मोठ्या प्रमाणात रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या मेगा भरतीनंतर मनुष्यबळाअभावी आरोग्य व्यवस्थेवर पडत असलेला ताण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच राज्यातील नागरिकांना विनाविलंब व सुलभ आरोग्य सुविधा पुरविणे शक्य होणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या ठिकाणी पंतप्रधानांच्या हस्ते, ६८ हजार कोटीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन अणि लोकार्पण

Next Post

या कारागृहातील सीसीटीव्ही यंत्रणेचे उद्घाटन…बंद्यांसाठी सोईसुविधा वाढणार

India Darpan

Next Post
unnamed 2024 02 03T234230.049

या कारागृहातील सीसीटीव्ही यंत्रणेचे उद्घाटन…बंद्यांसाठी सोईसुविधा वाढणार

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011