माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
लागोपाठ येणाऱ्या पश्चिमी झंजावातातून तसेच २८ ते ३० डिग्री अक्षवृत्त दरम्यान उत्तर भारतात, १२ किमी. उंचीवरील तपाम्बरच्या पातळीतील ताशी २७० ते ३०० किमी. वेगाने वाहणाऱ्या पश्चिमी वाऱ्याच्या झोतामुळे, अशा एकत्रित घडून आलेल्या घडामोडीमुळे महाराष्ट्राला एक फेब्रुवारीपर्यंत माफक पण थंडी अनुभवावयास मिळालीच. दिवसाचे कमाल तापमानही सरासरीपेक्षा कमीच राहिले. त्यामुळे दिवसाचा ऊबदारपणाही कमी राहून थंडीस मिळण्यास मदत मिळाली.
थंडी कमी होणार –
पुढील तीन दिवस म्हणजे २ ते ३ फेब्रुवारी दरम्यान कमाल व किमान तापमानात वाढ होवून थंडी काहीशी कमी होण्याची शक्यता जाणवली खानदेशातील नंदुरबार धुळे जळगांव जिल्ह्याच्या उत्तरेकडील परीक्षेत्रात ह्या ३ दिवसात काहीसे ढगाळ वातावरण राहू शकते.
पुन्हा थंडी मिळणार –
येत्या दोन दिवसात पश्चिम हिमालयीन क्षेत्रात पुन्हा नवीन येऊ घातलेल्या पश्चिमी झंजावाताच्या परिणामातून, सोमवार ५ फेब्रुवारी ते रविवार ११ फेब्रुवारी पर्यंतच्या संपूर्ण आठवडाभर कमाल व किमान तापमानाचा पारा घसरून महाराष्ट्रात पुन्हा चांगलीच थंडी पडण्याची शक्यता जाणवते.
मात्र हिवाळी हंगामासाठीचे कदाचित हे शेवटचेच थंडीचे आवर्तन ठरण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.