इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
२५ टन वजनी बोलार्ड पूल टग, महाबली हे कोची येथे रिअर अॅडमिरल सुबीर मुखर्जी, एनएम, एएसवाय यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आले. केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत, बांधण्यात आलेले हे स्वदेशी जहाज आहे.
ह्यासह तीन २५ टन वजनी टग्सच्या जहाजबांधणीची जबाबदारी, मेसर्स शोफ्ट शिपयार्ड प्रायव्हेट लिमिटेड (M/s SSPL), या एमएसएमई क्षेत्रातील कंपनीला देण्यात आली होती. आत्मनिर्भर भारत उपक्रमाचा संकल्प सिद्ध करत, या कंपनीने टगचे बांधकाम वेळेत पूर्ण केले. भारतीय जहाजबांधणी प्रबंधनाच्या नियमांनुसार हे टग्स तयार केले जात आहेत.
टगच्या उपलब्धतेमुळे नौदलाची जहाजे आणि पाणबुड्यांचे बर्थिंग आणि अन-बर्थिंग म्हणजे त्यांना समुद्रकाठी पार्क करणे आणि सोडवणे, मर्यादित पाण्यात फिरणे आणि वळण घेतांना या महाबलीची मदत होणार आहे. भारतीय नौदलाच्या कार्यान्वयनाला यामुळे चालना मिळेल, जहाजांवर अग्निशमन यंत्रणा वाहून नेता येईल, त्यामुळे मर्यादित स्वरूपाच्या शोध आणि बचाव मोहिमा यशस्वीपणे पार पाडता येतील.