अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आपल्यावर अनेक प्रघात होत असतांना आपण अडीच महिने शांत बसलो काहीही बोललो नाही. आम्ही शांत आहोत म्हणजे त्याचा अर्थ आम्ही घाबरलो असा होत नाही असे सांगत दिलबर के लिए दिलदार है हम, दुश्मन के लिए तलवार है हम या पंक्तीतून त्यांनी विरोधकांना इशारा दिला. जे आज माझा राजीनामा मागत आहे. त्यांना मला सांगायचे आहे की, १७ नोव्हेंबरला अंबड येथे पहिली जाहीर सभा झाली. सभेला जाण्यापूर्वीच आपण १६ नोव्हेंबरला राजीनामा दिला असा गौप्यस्फोट मंत्री छगन भुजबळ यांनी केला. ते म्हणाले की, मी ओबींसीसाठी शेवट पर्यंत लढणार असून ‘जीवन है संग्राम बंदे, ले हिमंत से काम’ असा एकच निर्धार आपण केला आहे.
आज ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार मेळावा आज अहमदनगर येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी ते मुख्यमंत्र्यांना सवाल उपस्थित करत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचा अवमान करायचा नाही. मात्र प्रश्न करायचा आहे वाशीमध्ये तुम्ही जाहीर केलं मी मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ घेतली होती ती मी पूर्ण केली. मग मला प्रश्न पडतोय की शपथ पूर्ण झाली तर आयोगाचा सर्वे कशाला? तपासणी करणारे लोक आपोआप माहिती भरतात. खोटं खोटं सुरू आहे. आरक्षण मिळाले तर हे कशासाठी? अनेक ठिकाणी खोटे कुणबी प्रमाणपत्र दिली जातात. तीनशे साठ कोटी रुपये खर्च यासाठी करत आहात का ? असे अनेक सवाल उपस्थित करत मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केले.