इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : सरकारने ऑनलाइन गेम्सवर बंदी घातली आहे. मात्र काही अभिनेते व अभिनेत्री यांनी परदेशात जाऊन ऑनलाईन गेम संबंधी जाहिराती मध्ये सहभाग घेतला घेतल्याचे उघड झाल्याने ईडीने याप्रकरणी चौकशी सुरू केली असून रणवीर कपूर, कपिल शर्मा हुमा कुरेशी आणि हिना खान हे आता ईडीच्या रडारवर असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणामुळे बॉलीवूडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
महादेव ॲपप्रकरणी ईडीने गेल्या आठवड्यात मुंबईतील पाच चित्रपट व मालिका निर्मात्या कंपन्यांच्या कार्यालयांवर छापेमारी केली आहे. महादेव ॲप कंपनीने या पाच कंपन्यांमध्ये पैसे गुंतवल्याचा ईडीला संशय असून, त्याच अनुषंगाने ही छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे ‘लायन बुक ॲप’ या ॲपच्या माध्यमातून, महादेव ॲपप्रमाणेच भारत व पाकिस्तानमध्ये या ॲपच्याद्वारे सट्टेबाजी चालते. त्याची ईडीकडून पुन्हा चौकशी सुरू असून संजय दत्त, सुनील शेट्टीची दुबईतील पार्टीला हजेरीमुळे खळबळ उडाली आहे.
महादेव ॲप कंपनीच्या नव्या ॲपच्या सक्सेस पार्टीला अभिनेता संजय दत्त, सुनील शेट्टी यांच्यासह बॉलीवूडमधील अनेक नामवंत कलाकारांनी हजेरी लावल्याने चांगलीच खळबळ उडून चर्चा रंगली आहे. महादेव ॲपनंतर आता हे नवे ॲप, त्यात झालेले व्यवहार, त्यातील बॉलीवूडचा सहभाग आदी गोष्टींचा तपास आता ईडीच्या रडार आला आहे. ईडी या प्रकरणी बॉलीवूडमधील कलाकारांची कसून चौकशी करत असून यात आणखी काही कलाकार गुंतल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
खरे तर महादेव ॲपप्रमाणेच भारत व पाकिस्तान या दोन शेजारी देशांमध्ये लायन बुक ॲप गुप्त व्यवहार होत असून,ॲपच्या माध्यमातून सट्टेबाजी चालते. महादेव ॲप कंपनीचा प्रवर्तक सौरभ चंद्राकर व रवी उप्पल यांनी हितेश खुशलानी या व्यक्तीला सदरनव्या ॲपचा प्रवर्तक केले असून हितेश हा याचा व्यवहार बघत असला तरी त्याचे मुख्य सूत्रधार अन्य आहेत हे आता उघड झाले, कारण, पडद्यामागून प्रत्यक्ष व्यवहार हे दोघेच चालवत असल्याची माहिती ईडीला मिळाली आहे. या ॲपचे प्रमोशनदेखील बॉलीवूडमधील काही नामवंत कलाकारांनी केले असून, या प्रमोशनकरिता त्यांनी रोखीने मानधन स्वीकारले आहे, ही रोख रक्कम हवालाच्या माध्यमातून आली होती.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दुबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये झाली. या पार्टीकरिता अभिनेता संजय दत्त, सुनील शेट्टी, डेझी शहा, सोफी चौधरी अशा कलाकारांनी उपस्थिती लावल्याची माहिती समोर आली आहे. परदेशामध्ये कितीही गुपचूपपणे काही गैरवर्तन केले तर ते नक्कीच उघड होते याची जाणीव मात्र या कलाकारांना नाही का ? अशी चर्चा आता सुरू आहे. विशेष म्हणजे यापुर्वी महादेव ॲपप्रकरणी तपास यंत्रणेने आतापर्यंत ४१७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. तसेच सौरभ चंद्राकर व रवी उप्पल यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस देखील जारी केली आहे. या दोघांनी आणखी काही वेबसाईट आणि ॲप तयार केल्याचा ईडीला संशय आहे.