रविवार, ऑगस्ट 31, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

साहित्य संमेलन…साने गुरूजींच्या पुस्तकांचे इतर भाषांमध्ये अनुवाद व्हावा…सुधा साने

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 3, 2024 | 8:07 pm
in राज्य
0
IMG 20240203 WA0374 1 scaled e1706971030583

अमळनेर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – श्यामची आई यापुस्तकाचे 13 भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. तसेच जपानी, चीनी व इंग्रजीत अनुवाद करण्यात आला आहे. त्यांच्या काही महत्त्वाचे पुस्तकांचे अनुवाद झाले पाहिजे झाले. याकरीता प्रकाशकांनी पुढे आले पाहिजे, अशी अपेक्षा साने गुरूजी यांच्या पुतणी सुधा साने व्यक्त केली. साने गुरूजींचे 125 जन्म वर्ष आहे. त्यांच्या साहित्यांची खुप गरज आहे. येणाऱ्या काळात महामंडळाने यासंदर्भात उपक्रम हाती घेण्याची गरज आहे. गुरूजींच्या मृत्यूला 75 वर्ष पूर्ण होत आली आहेत, परंतु, आजही खान्देशाच्या मातीत त्यांचा प्रेमाचा दरवळ असल्याचे त्या म्हणाल्या.

साने गुरूजी यांच्या पुतणी सुधा साने यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार लोकसभा माजी सभापती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना सुधा साने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, 1923 सालच्या जुलै महिन्यात गुरूजींनी अमळनेरच्या मातीत पहिले पाऊल टाकले. खान्देशाच्या मातीत एकरूप झाले. कामगारांना न्याय मिळावा म्हणून लढे उभारले. त्यांनी 50 वर्षांच्या आयुष्यातील साडे आठ वर्ष तुरूगांत काढले. साहित्याचे विविध प्रकार हाताळले. 1924 साली त्यांनी प्रथम पुस्तक लिहिले. 100 हून अधिक पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांच्या कर्मभूमीत 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे याचा मला विशेष आनंद होत आहे. त्यांच्या कामांची दखल घेतली त्यांचा गौरव समजते असेही त्या म्हणाल्या.

अलक्षित साने गुरूजी परिसंवादातून उलगडले विविध पैलू
अलक्षित साने गुरूजी या परिसंवदात पूज्य साने गुरुजी यांच्या व्यक्तीमत्त्वातील विविध पैलूंचा समग्र विचारमंथन करण्यात आले. यात प्रामुख्याने साने गुरूजी यांनी नेहमीच मातृहृदयी लेखक म्हणून ओळखले जाते परंतु, त्यांची ओळख तेवढीच नव्हती ते समाज सुधारक, कामगार नेते, विचारवंत, स्त्री आणि दलितांसाठी चळवळ उभारणारे नेते म्हणून पाहिले गेले पाहिजे, अशी अपेक्षा या परिसंवादातून व्यक्त करण्यात आली.
डॉ. मंजूषा कुलकर्णी यांनी साने गुरूजी यांच्याकडे साधन नसताना देखील वेगवेगळे कार्य सिघ्दीस नेले असल्याचे सांगितले. गुरूजी हे वेद व वेदाचे ज्ञाता होते. मरणोप्रांत जीवनाचे उत्तम उदाहरण हे साने गुरूजी होते असे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. ललित अधाने म्हणाले की, साने गुरुजी यांना असामन्य व्यक्तीमत्त्व लाभले होते. ते सर्व पिढीचे आवडते लेखक आहेत. भालचंद्र नेमाडे यांनी गुरूजींना संत परंपरेतील साहित्य म्हणून गौरवीले असल्याचे स्पष्ट केले आहे. गुरूजींने जे अनुभवले तेच लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. प्रा. लक्ष्मण गंगाधर सोनवणे म्हणाले की, साने गुरूजी यांचे जीवन एक कोडे बनले आहे. गुरूजी लेखक, विचावंत, स्वातंत्र्यवीर, कामगार नेते अशा विविध भूमिका साकरल्या आहेत. येववडा कारागृहात असताना त्यांची आर्चाय विनोबा भावे यांची भेट झाली होती. यातून त्यांना सामाजिक कार्यांची प्रेरणा मिळाली. त्यांनी हिंदू मुस्लिम एकतेसाठी 1937 साली सोन्या मारोती नावाची कांदबरी लिहली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. परमानंद बावनकुळे म्हणाले की, साने गुरूजी यांनी शिक्षणी पेशाचा राजीनामा देऊन स्वातत्र्य संग्रमात उडी घेतली होती. त्यांचे कार्य दुर्लक्षित राहिले आहे. यात ते लेखक, संत, स्वातंत्र्य सेना म्हणून कार्य केले. परंतू, त्यांच्यातील लेखकाने संत, स्वातत्र्य सेनानी हे पैलू दुर्लक्षित राहिले आहेत. त्यांनी सामाजिक कार्य करतांना दुसऱ्यांचे आंधानुकरण केले नाही. जगातील चांगले साहित्य मराठी अनुवादीत करण्याची संकल्पना त्यांनी मांडली आहे. त्यांनी बहुजन, पिडीत वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी उपोषण देखील केले होते. त्यांनी निर्भिडपणे नेतृत्व केले.
प्रकाश पाठक यांनी गुरूजींनी मातृधर्माला कुटूंब धर्माची जोड दिली. वसुंधरा कुटूंब कल्यमनुसार त्यांनी संपूर्ण जगावर प्रेम केले. सामाजिक जीवन ममत्त्वने जोडले पाहिजे. त्यांनी त्यांचे जीवन समता स्वातंत्र्य बंधूता यांनी जोडले आहे. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे. ते समतेचे पुरस्कर्ते होते त्यांचा हा गुण दुर्लक्षीत झाला आहे.

अध्यक्ष चैत्रा रेडकर यांनी साने गुरूजी यांच्या श्यामची आई सोबत त्यांच्या सोन्या मारोती, संध्या, सुधास पत्र यांचे देखली वाचन केले गेले पाहिजे असे अपेक्षा व्यक्त केली. गुरूजी निर्भय व करारी होते. त्यांनी कागमारांचे आंदोलन केले. आता पेटवू सारे रान असे म्हणत शेतकऱ्यांसाठी लढा उभारला. जगण्यात करुणा नसेल तर धर्म अभिव्यक्तीसाठी मानावे का असा प्रश्न उपस्थित केला होता.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सर्व आशा व अंगणवाडी सेविकांना मिळणार आयुष्मान भारत कार्डचा लाभ: डॉ. भारती पवार

Next Post

अमळनेर येथे साहित्य संमेलनात पडला कवितांचा पाऊस…या कवींचा सहभाग

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी खर्चावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, रविवार, ३१ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 30, 2025
manoj jarange
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पोलिसांनी दिली आणखी एक दिवसाची मुदतवाढ…

ऑगस्ट 30, 2025
udhav 11
महत्त्वाच्या बातम्या

उध्दव ठाकरेंचा मनोज जरांगे पाटील यांना फोन…दीड ते दोन मिनिट चर्चा

ऑगस्ट 30, 2025
Gzl81fKWwAE3m6S 1920x1091 1
महत्त्वाच्या बातम्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन….

ऑगस्ट 30, 2025
Untitled 49
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांची शिंदे समितीने घेतली भेट…झाली ही चर्चा

ऑगस्ट 30, 2025
crime1
क्राईम डायरी

जुन्या वादातून तरूणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली, तरुण जखमी…गुन्हा दाखल

ऑगस्ट 30, 2025
Raj Thackeray1 2 e1752502460884
महत्त्वाच्या बातम्या

गेल्यावेळेस प्रश्न सोडवला होता ना, मग परत मराठा आंदोलन का? एकनाथ शिंदे यांना विचारा….राज ठाकरे यांची प्रतिक्रिया

ऑगस्ट 30, 2025
Untitled 48
राज्य

महाराष्ट्राचा विविध कंपन्यांशी १७ सामंजस्य करार…३४ हजार कोटींचा गुंतवणूक, ३३ हजार रोजगार निर्मिती

ऑगस्ट 30, 2025
Next Post
IMG 20240108 WA0237 2

अमळनेर येथे साहित्य संमेलनात पडला कवितांचा पाऊस…या कवींचा सहभाग

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011