शुक्रवार, जुलै 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

‘विश्व राजकपूर सिनेरत्न गोल्डन पुरस्कार’ वितरण…राज्यपालांच्या हस्ते यांचा झाला गौरव

by India Darpan
फेब्रुवारी 3, 2024 | 7:22 pm
in राज्य
0
IMG 20240203 WA0368 1

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कपूर कुटुंबाने आपल्या कर्तृत्वाने हिंदी चित्रपटसृष्टीच्या विकासात आणि उत्कर्षात मोलाचे योगदान दिले आहे. राज कपूर हे भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेले सुंदर स्वप्न आणि चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजविणारे कलाकार होते, असे गौरवोद्गार राज्यपाल रमेश बैस यांनी प्रथम ‘विश्व राजकपूर सिनेरत्न गोल्डन पुरस्कार’ वितरण सोहळ्यात काढले.

श्री ज्ञानेश्वर वर्ल्ड पीस डोम येथे आयोजित माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी पुणे तर्फे देण्यात येणारा प्रथम ‘विश्व राजकपूर सिनेरत्न गोल्डन पुरस्कार’ वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विश्वनाथ कराड, कुलगुरु डॉ.मंगेश कराड, कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड, प्रसिद्ध चित्रपट निर्माते किरण शांताराम, प्रख्यात लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक एन. चंद्रा, साहित्यकार सिद्धार्थ काक, अभिनेते गजेन्द्र चौहान उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले, भारतीय चित्रपट क्षेत्राच्या सुवर्णयुगात राज कपूर यांच्यासारख्या महान कलाकाराचा उदय झाला. राज कपूर यांनी आपल्या बहारदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत अनेक वर्षे रुपेरी पडद्याची शोभा वाढविली. विविधरंगी भूमिकांद्वारे त्यांनी प्रेक्षकांना हसविले, रडविले आणि प्रेम दिले. चित्रपटांच्या माध्यमातून त्या काळातील सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकला.

श्री. बैस पुढे म्हणाले, त्यांच्या काळात भाषा आणि सांस्कृतिक विविधतेवर मात करत समाजातील विविध घटनांची पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटांनी समाजाला एकजूट केले होते. सामान्य माणसाशी जोडल्या गेलेल्या त्यांच्या भूमिकांमधून सामान्य माणसाच्या आकांक्षा, त्याचा संघर्ष आणि सन्मान प्रतिबिंबीत झाला आहे. भारतासह रशिया, इजिप्त, मध्य पूर्व आशिया तसेच दक्षिण अमेरीकेतही त्यांचे चित्रपट गाजले. या पुरस्कारामुळे स्व. राज कपूर यांच्या स्मृती चिरंतन राहतील, असे त्यांनी सांगितले.

पृथ्वीराज कपूर यांच्यानंतरही कपूर कुटुंबातील अनेक सदस्यांनी चित्रपट क्षेत्रात मोलाची कामगिरी केली आहे. या कुटुंबातील सदस्यांनी किमान ३०० पेक्षा अधिक चित्रपटात अभिनय, निर्मिती, दिग्दर्शनाचे कार्य केले. भारतीय चित्रपटांच्या सुवर्णयुगात पृथ्वीराज कपूर आणि राज कपूर यांच्यासह अनेक अभिनेते, अभिनेत्री, संगीतकार, कथा लेखक आणि गीतकारांनी केलेले कार्य स्मरणीय आहे. रचनात्मक आणि कलात्मक अभिव्यक्तीचा तो काळ होता. याच काळातील चित्रपट मनोरंजनासोबत प्रेरणा देणारे होते. देशातील बदलत्या सामाजिक प्रश्नांचे आणि घटनांचे प्रतिबिंब त्या काळातील चित्रपटात दिसून येत होते. याच काळात राष्ट्रीय एकता बळकट करण्याचे महत्वाचे कार्य भारतीय चित्रपटांनी केले, असे राज्यपाल म्हणाले.

चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्राच्या सुवर्ण युगाचा साक्षीदार असल्याचे समाधान आपल्याला लाभले असून स्व.राज कपूर यांच्या अभिनयाचा चाहता असल्याचेही श्री.बैस यावेळी म्हणाले.एमआयटी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विश्वनाथ कराड यांनी पृथ्वीराज कपूर आणि कपूर कुटुंबियांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी पुरस्काराची सुरुवात केल्याचे आणि दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी किरण शांताराम यांनीही विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला चित्रपट व नाट्य क्षेत्रातील मान्यवर, विविध विभागांचे प्रमुख तसेच विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘विश्व राज कपूर सिनेरत्न गोल्डन पुरस्कार’ रणधीर कपूर यांच्यावतीने आदिनाथ मंगेशकर यांनी स्वीकारला. स्वर्गीय गायक मुकेश यांच्या नावाने गायक नील नितिन मुकेश यांना जाहीर करण्यात आलेला पुरस्कार मुकेश शर्मा यांनी स्वीकारला.

कार्यक्रमापूर्वी एमआयटी विद्यापीठाच्या परिसरातील राज कपूर यांच्या समाधीला आणि स्मृती संग्रहालयास राज्यपाल रमेश बैस यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी राज कपूर यांच्या आठवणींना उजाळा दिला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या शहरात ‘जाणता राजा’महानाट्य प्रयोगाला उदंड प्रतिसाद

Next Post

नाशिक उपकेंद्राला सहायक कुलसचिव मिळाला…श्रीपाद बुरकुले विद्यापीठ उपकेंद्राचे नवे प्रमुख..

India Darpan

Next Post
IMG 20240203 WA0140 e1706969341343

नाशिक उपकेंद्राला सहायक कुलसचिव मिळाला…श्रीपाद बुरकुले विद्यापीठ उपकेंद्राचे नवे प्रमुख..

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011