इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये सायबर गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेषतः मोबाईलवर फोन करून किंवा मेसेज पाठवून एखाद्या व्यक्तीचे फसवणूक करीत त्याच्या बँका त्यातून मोठी रक्कम नंबर काढण्याचे प्रकार गेल्या काही दिवसात वाढतच चालले आहेत. यामध्ये प्रसिद्ध बॉलीवूडमधील अभिनेते – अभिनेत्री तसेच गायक यांचा देखील समावेश असून झाल्याचे प्रकार गेल्या दोन-तीन वर्षात असे घडले आहेत. त्यातच आता आणखी एक अभिनेत्याची भर पडली आहे. त्याची अशाच प्रकारे फसवणूक झाली असून या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. बॉलिवूड अभिनेता आफताब शिवदासानी सायबर फसवणूकीचा बळी ठरला आहे. एका खोटया मेसेजमुळे त्याच्या बँक खात्यातून सुमारे १ लाख ५० हजार रुपये लंपास करण्यात आले.
त्याच्या कमाईचा घेतला गुन्हेगाराने फायदा
आफताब शिवदासानी याला खासगी बँकेचे केवायसी अपडेट करण्यासाठी मेसेज आला होता. याचदरम्यान त्याच्या खात्यातून पैसे काढले गेले. मात्र काहीतरी गडबड असल्याचे लक्षात येताच आफताबने बँक व्यवस्थापकाशी संपर्क साधला. मॅनेजरने त्याला डेबिट झालेल्या पैशांबाबत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे आफताबने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
ऑनलाइन फसवणुकीचा बळी ठरला
सर्व सामान्य नागरिकच नव्हे तर मोठे उद्योजक – व्यावसायिक आणि बॉलिवूड अभिनेते देखील सायबर फ्रॉडमध्ये फसून लाखो रुपये गमावून बसत आहेत. अभिनेता अफताब शिवदसानीही सायबर फ्रॉडचा शिकार झाला असून शिवदसानीला एक लिंक मेसेजवर आली होती. त्यावर त्याने क्लिक करताच त्याला एक कॉल आला. कॉलवर बोलणाऱ्या व्यक्तीने आफताबला बँकेच्या पेजवर त्याचा मोबाईल नंबर आणि पिन नंबर टाकण्याची विनंती केली. त्यानंतर आफताबने सर्व तपशील भरले. यानंतर आफताबच्या बँक खात्यातून तब्बल १ लाख ४९ हजार रुपये काढण्यात आल्याचा मेसेज आला. या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.